कराची - पाकिस्तान क्रिकेटचे नवे मुख्य निवडकर्ता मोहम्मद वसीम दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेसाठी आज २० सदस्यीय संघाची घोषणा करणार आहे. उभय संघात पहिली कसोटी २६ जानेवारीपासून कराचीच्या राष्ट्रीय स्टेडियमवर सुरू होईल, तर दुसरी कसोटी रावळपिंडी येथे ४ ते ८ फेब्रुवारी दरम्यान खेळली जाईल.
या कसोटी मालिकेनंतर लाहोरमध्ये दोन्ही संघांमध्ये तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातील. पहिला सामना ११ फेब्रुवारी, दुसरा १३ व अंतिम सामना १४ फेब्रुवारी रोजी होईल. एका आठवड्यानंतर हा संघ कमी करून १६ खेळाडूंचा होईल. संघ निश्चित करण्यापूर्वी मी कर्णधार बाबर आझम, मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक आणि प्रांतीय संघांचे प्रमुख प्रशिक्षक यांच्याशी सल्लामसलत करत आहे, असे वसीम यांनी सांगितले.
दक्षिण आफ्रिकेने यापूर्वीच त्यांच्या संघाची घोषणा केली आहे.
संघ : क्विंटन डिकॉक (कर्णधार), फाफ डु प्लेसीस, डीन एल्गर, कगिसो रबाडा, टेंबा बावुमा, एडन मार्क्राम, केशव महाराज, ड्वेन प्रेटोरियस, लुंगी एनगिडी, रेसी व्हॅन डर डुसेन, एनरिच नॉर्टजे, वियान मालडर, लुथो सिपमाला, बुरेन हेंड्रिक्स, काइल व्हेरिन, सेरल एर्वी, कीगन पीटरसन, तबरेज शम्सी, जॉर्ज लिंडे, डारिन डुपाविलॉन, ऑटोनिल बर्टमॅन.