ETV Bharat / sports

पाकिस्तानच्या अकमलची भरारी, 'या' विक्रमात धोनीला टाकले मागे

टी-२० क्रिकेटमध्ये १०० खेळाडूंना यष्टीचीत करणारा कामरान अकमल जगातील पहिला यष्टीरक्षक ठरला आहे. माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनी टी-२० क्रिकेटमध्ये ८४ यष्टीचीतसह दुसर्‍या क्रमांकावर आहे.

pakistan wicketkeeper kamran akmal first wicketkeeper to affect 100 t20 stumpings
पाकिस्तानच्या अकमलची भरारी, 'या' विक्रमात धोनीला टाकले मागे
author img

By

Published : Oct 16, 2020, 3:56 PM IST

लाहोर - पाकिस्तानचा यष्टीरक्षक-फलंदाज कामरान अकमल टी-२० क्रिकेटमध्ये १०० खेळाडूंना यष्टीचीत करणारा जगातील पहिला यष्टीरक्षक ठरला आहे. ३८ वर्षीय कामरानने नॅशनल टी-२० कपदरम्यान हा पराक्रम केला. मंगळवारी मध्य पंजाब आणि दक्षिण पंजाब यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने हा इतिहास रचला.

"टी-२० क्रिकेटमध्ये १०० यष्टीचीत करणारा पहिला यष्टीरक्षक. अभिनंदन कामरान अकमल. मोठी कामगिरी", असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विटरवर म्हटले आहे. माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनी टी-२० क्रिकेटमध्ये ८४ यष्टीचीतसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. तिसर्‍या क्रमांकावर कुमार संगकारा असून त्याच्या नावावर ६० यष्टीचीत फलंदाजांची नोंद आहे.

pakistan wicketkeeper kamran akmal first wicketkeeper to affect 100 t20 stumpings
महेंद्रसिंह धोनी

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये धोनी ३४ यष्टीचितसह (९८ सामने) अव्वल स्थानी आहे. धोनीनंतर, अकमल आहे. त्याने पाकिस्तानकडून ५८ सामन्यांत ३२ फलंदाजांना यष्टीचित केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.