इस्लामाबाद - पाकिस्तान विरुध्द श्रीलंका संघामध्ये होणारी मालिका चर्चेचा विषय ठरलेली आहे. सुरूवातीला पाकिस्तान दौऱ्यासाठी श्रीलंकेच्या मुख्य खेळाडूंनी नकार दिला. यानंतर वाद-विवाद होत गेले आणि शेवटी श्रीलंकन बोर्डाने नकार दिलेल्या खेळाडूंना वगळून एक संघ पाकिस्तान दौऱ्यासाठी पाठवला. अशा विविध घटनानंतर आता हा दौरा आणखी एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे.
हेही वाचा - कौतुकास्पद..! अपघातात गंभीर जखमी झालेल्या चाहत्याच्या मदतीला धावला हार्दिक पांड्या
पाकिस्तानच्या मीरपूर परिसरात याच आठवड्यात भूकंप झाला आहे. यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. या भूकंप पीडित नागरिकांसाठी पाकिस्तानचा फिरकीपटू शादाब खान धावला आहे. त्याने श्रीलंकेविरुध्दच्या मालिकेतील 'फी'ची रक्कम मदत म्हणून देण्याचे जाहीर केले आहे. शादाबने याची घोषणा सोशल मीडियावरुन केली आहे.
हेही वाचा - विधानसभा निवडणूक : भारताच्या दोन खेळाडूंनी केला भाजपमध्ये प्रवेश
दरम्यान, श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यात तीन एकदिवसीय सामन्याची मालिका खेळणार आहे. या मालिकेला २७ सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. एकदिवसीय मालिकेनंतर उभय संघात ३ टी-२० सामन्याची मालिका होणार आहे. २००९ साली खेळाडूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक संघानी पाकचा दौरा करण्यास नकार दिला आहे.