ETV Bharat / sports

पाक फलंदाजांनी केली भारतीय संघाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी

कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानने आपला दुसरा डाव ४७५ धावांवर घोषित केला. पाकिस्तानकडून शान मसूद (१३५), आबिद अली (१७४), अझहर अली (११८) आणि बाबर आझम यांनी शतक झळकावल.

pakistan team equals record of smash 4 century by top 4 batsman in test match by team india
पाक फलंदाजांनी केली भारतीय संघाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
author img

By

Published : Dec 22, 2019, 3:36 PM IST

कराची - पाकिस्तानच्या पहिल्या चार फलंदाजांनी, भारतीय संघाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी साधली. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचे अव्वल चार फलंदाजांनी शतक ठोकलं. यापूर्वी असा कारनामा फक्त भारतीय संघाला करता आला होता.

कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानने आपला दुसरा डाव ४७५ धावांवर घोषित केला. या सामन्यात पाकिस्तानकडून शान मसूद (१३५), आबिद अली (१७४), अझहर अली (११८) आणि बाबर आझम (१००) यांनी शतक झळकावलं.

यापूर्वी असा कारनामा, भारतीय संघाने १२ वर्षापूर्वी केला होता. २००७ मध्ये भारताच्या चार फलंदाजांनी बांग्लादेशविरुद्ध खेळताना चार शतकं झळकावली होती. ढाका येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताकडून दिनेश कार्तिक (१२९), वसीम जाफर (१३९), राहुल द्रविड (१२९) आणि सचिन तेंडुलकर (१२२) यांनी शतक झळकावलं होतं.

भारताच्या या विश्वविक्रमाशी पाकिस्तान संघाने बरोबरी साधली आहे. दरम्यान, श्रीलंका आणि पाकिस्तान संघात सुरू असलेल्या यजमान संघाने श्रीलंकेला ४७६ धावांचे लक्ष्य दिले आहे. तर पाकिस्तानला विजयासाठी 10 विकेटची गरज आहे. उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत असून पहिला सामना अनिर्णित राहिला आहे.

हेही वाचा - टीम इंडियाची १० व्या मालिका विजयावर नजर, तिसरा निर्णायक सामन्यासाठी संघ सज्ज

हेही वाचा - ४ सामन्यात फक्त ३४ धावा!..वाचा बाराबती स्टेडियमवर कॅप्टन कोहलीचा इतिहास

Intro:Body:

spo

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.