लाहोर - पाकिस्तानचा संघ मायदेशात बांगलादेशविरुद्ध दोन सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे. उभय संघात पहिल्या कसोटीला ७ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. तर दुसरा कसोटी सामना एप्रिल महिन्यात खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, पाकिस्तानने या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे.
पाकिस्तानने १६ सदस्यीय संघ निवडला आहे. यात बिलाल आसिफ आणि फहिम अशरफ यांना संधी मिळाली आहे. दोघेही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पाकिस्तानच्या संघात नव्हते. आसिफने कायद ए आझम चषकात ४३ गडी बाद केले आहेत. तर अशरफने सेंट्रल पंजाब संघाकडून खेळताना तीन सामन्यात ८ गड्यांना माघारी धाडलं.
आसिफने २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. दुबईमध्ये झालेल्या या सामन्यात त्याने ६ गडी बाद केले होते. दरम्यान, पाक संघाचे कर्णधारपद अझहर अलीकडे कायम ठेवण्यात आले आहे.
असा आहे पाकिस्तानचा कसोटी संघ -
अझहर अली (कर्णधार), आबिद अली, इमाम उल-हक, शान मसूद, बाबर आझम, असद शफिक, हॅरिस सोहेल, फवाद आलम, मोहम्मद रिजवान (यष्टीरक्षक), यासिर शाह, इमरान खान, मोहम्मद अब्बास, शाहीन अफरीदी, बिलाल आसिफ, नसीम शाह आणि फहीम अशरफ.
हेही वाचा - ICC Ranking : विराटची 'बादशाह'त कायम, फिलँडरचा ११ व्या स्थानी शेवट
हेही वाचा - महाराष्ट्राची 'सुलक्षणा' BCCI मध्ये, बजावणार 'ही' महत्वपूर्ण भूमिका