दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज शुक्रवारी आपली जागतिक टी-२० क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत पहिल्यांदाच आयसीसीकडून तब्बल ८० देशांचा समावेश करण्यात आला आहे. आयसीसीच्या या टी-२० क्रमवारीत भारताच्या संघाला ३ स्थानांचे नुकसान झाले असून भारतीय संघ पाचव्या स्थानी घसरला आहे.
सध्याच्या जागतिक टी-२० क्रमवारीत पाकिस्तानचा संघ २८६ गुणांसह पहिल्या स्थानी विराजमान आहे. तर दक्षिण आफ्रिका २६२ गुणांसह दुसऱ्या आणि इंग्लंडचा संघ २६१ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.
भारताचे टी-२० क्रमवारीत जरी घसरण झाली असली तरी, एकदिवसीय आणि कसोटी क्रमवारीत मात्र भारतीय क्रिकेट संघाचाच दबदबा पाहायला मिळतो आहे. वनडेत भारत दुसऱ्या तर कसोटीत पहिल्या स्थानी विराजमान आहे.
आयसीसीच्या टी-२० क्रमवारीतील पहिले १० संघ
- १) पाकिस्तान - २८६ गुण
- २) दक्षिण आफ्रिका - २६२ गुण
- ३) इंग्लंड - २६१ गुण
- ४) ऑस्ट्रेलिया - २६१ गुण
- ५) भारत - २६० गुण
- ६) न्यूझीलंड - २५४ गुण
- ७) अफगाणिस्तान - २४१ गुण
- ८) श्रीलंका - २२७ गुण
- ९) विंडीज - २२६ गुण
- १०) बांगलादेश - २२० गुण