लंडन - इंग्लंड आणि पाकिस्तान संघात आजपासून तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात होत आहे. आजचा हा सामना ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळला जाईल. या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तानने १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात माजी कर्णधार सरफराज अहमदला स्थान देण्यात आले आहे. हा सामना दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल.
-
Pakistan's squad for the first England Test:
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Azhar A (c), Babar A (vc), Abid A, Asad S, Fawad A, Imam, Kashif B, M Abbas, M Rizwan, Naseem S, Sarfaraz A, Shadab K, Shaheen A, Shan M, Sohail K and Yasir S.#ENGvPAK pic.twitter.com/i3SaXeHoIC
">Pakistan's squad for the first England Test:
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 4, 2020
Azhar A (c), Babar A (vc), Abid A, Asad S, Fawad A, Imam, Kashif B, M Abbas, M Rizwan, Naseem S, Sarfaraz A, Shadab K, Shaheen A, Shan M, Sohail K and Yasir S.#ENGvPAK pic.twitter.com/i3SaXeHoICPakistan's squad for the first England Test:
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 4, 2020
Azhar A (c), Babar A (vc), Abid A, Asad S, Fawad A, Imam, Kashif B, M Abbas, M Rizwan, Naseem S, Sarfaraz A, Shadab K, Shaheen A, Shan M, Sohail K and Yasir S.#ENGvPAK pic.twitter.com/i3SaXeHoIC
सामन्याच्या आदल्या दिवशी पत्रकारांशी बोलताना पाकिस्तानच्या कसोटी संघाचा कर्णधार अझर अलीने संघाची घोषणा केली. २०१९पासून कसोटी क्रिकेटमध्ये ब्रेक घेतलेल्या वहाब रियाजने अलीकडेच खेळाच्या लांबलचक स्वरूपासाठी स्वतः ला उपलब्ध असल्याचे जाहीर केले होते. पण त्याला संघात स्थान मिळालेले नाही.
अझर म्हणाला, "आमच्याकडे जितका वेळ होता, त्यात आम्ही तयारी केली आहे. खेळाडूंनी खूप परिश्रम घेतले. आम्ही वोर्सेस्टर येथून सुरुवात केली त्यानंतर, डर्बीला गेलो. सर्व खेळाडू उत्साही आणि खेळायला तयार आहेत." तीन सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित दोन सामने साऊथम्प्टन येथे खेळले जातील. दुसरी कसोटी १३ ऑगस्टपासून तर, तिसरी कसोटी २१ ऑगस्टपासून खेळवली जाईल.
पाकिस्तानचा संघ -
अझर अली, बाबर आजम, आबिद अली, असद शफीक, फवाद आलम, इमाम-उल-हक, काशिफ भट्टी, मोहम्मद अब्बास, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सरफराज अहमद, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, सोहेल खान, यासिर शाह.