मुंबई - पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शादाब खानला दुखापत झाली आहे. डॉक्टरांनी त्याला ६ आठवड्याची विश्रांतीचा सल्ला दिला आहे. यामुळे शादाब दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जानेवारी महिन्यात होणाऱ्या टी-२० आणि कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.
शादाब खानला न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात दुखापत झाली होती. त्याचे मांडीचे स्नायू ताणले गेले होते. न्यूझीलंडच्या नेपियरमध्ये त्याचा स्कॅन करण्यात आला. यात त्याची दुखापत गंभीर असल्याचे समोर आले. डॉक्टरांनी यामुळे शादाबला ६ आठवड्याची विश्रांती सल्ला दिला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ नविन वर्षाच्या सुरूवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात पाकिस्तानचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात उभय संघात दोन कसोटी आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.
पाकिस्तान संघाचे डॉक्टर सलीम यांनी सांगितले की, सहा आठवड्यानंतर शादाब याचा पुन्हा स्कॅन केला जाणार आहे आणि रिपोर्ट पाहून पुढील निर्णय घेतला जाईल.
दरम्यान, याआधी मागील महिन्यात शादाबला दुखापत झाली होती. यामुळे तो झिम्बाब्वेविरुद्धची मालिका खेळू शकला नव्हता.
हेही वाचा - Boxing Day Test : लाबूशेन याने केलं भारतीय गोलंदाजांचे कौतूक, म्हणाला...
हेही वाचा - IND Vs AUS : विराट भारतात मन मात्र ऑस्ट्रेलियात; पहिल्या दिवसाच्या खेळावर दिली 'ही' प्रतिक्रिया