रावळपिंडी - पाकिस्तान संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ९५ धावांनी पराभव केला आणि दोन सामन्याच्या मालिकेत २-० असे निर्भेळ यश मिळविले. पाकिस्तानने दिलेल्या ३७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ २७४ धावांपर्यंत मजल मारू शकला. सलामीवीर एडेन मार्करम याने १३ चौकार आणि ३ षटकारांसह १०८ धावांची खेळी साकारली. पण तो देखील संघाचा पराभव वाचवू शकला नाही. हसन अलीने दुसऱ्या डावात ५ विकेट घेत आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडले. अलीने संपूर्ण सामन्यात १० गडी बाद केले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
-
The winning moment 💥#PAKvSA pic.twitter.com/nAIMFi9jWg
— ICC (@ICC) February 8, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The winning moment 💥#PAKvSA pic.twitter.com/nAIMFi9jWg
— ICC (@ICC) February 8, 2021The winning moment 💥#PAKvSA pic.twitter.com/nAIMFi9jWg
— ICC (@ICC) February 8, 2021
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी १६ विकेट घेतल्या. यात हसन अलीने १० गडी टिपले. तर सहा विकेट शाहिन शाह आफ्रिदीने घेतले. दरम्यान, पाकिस्तानने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्यांदा व्हाइटवॉश दिला आहे.
पाकिस्तानच्या धर्तीवर १८ वर्षांनंतर एका कसोटीत १० विकेट घेणारा हसन अली पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. याआधी शोएब अख्तरने २००३ मध्ये बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात १० विकेट घेतले होते. विशेष म्हणजे, पाकिस्तानच्या संघाने २००३ नंतर प्रथमच आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका जिंकली आहे.
हेही वाचा - कसोटी डावातील पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा अश्विन ठरला पहिला भारतीय फिरकीपटू
हेही वाचा - Ind vs Eng : भारतीय संघाला विजयासाठी ४२० धावांचे आव्हान; अश्विनचा विकेट्सचा षटकार