लाहोर - पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानने कार अपघातात मृत्यू झाल्याच्या बातम्यांना अफवा म्हटले आहे. रविवारी सोशल मीडियावर इरफानच्या मृत्यूबद्दल अनेक पोस्ट्स व्हायरल झाल्या होत्या. मात्र, इरफानने या बातम्यांना पूर्णविराम दिला. त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून लोकांनी बनावट बातम्या पसरवू नयेत, अशी विनंती केली.
इरफानने ट्विटरवर लिहिले, "कार अपघातात माझा मृत्यू झाला असल्याची ही निराधार बातमी सोशल मीडियावर पसरली आहे. यामुळे माझे कुटुंब आणि मित्र खूप अस्वस्थ झाले. मला सतत फोन येत आहेत. कृपया गोष्टींपासून दूर राहा आणि कोणताही अपघात झालेला नाही. आम्ही सुरक्षित आहोत."
-
Some social media outlets have been spreading a baseless fake news about my death in a car accident. This has disturbed my family & friends beyond words, and I have been receiving endless calls on this. Please refrain from such things. There was no accident and we are well.
— Mohammad Irfan (@M_IrfanOfficial) June 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Some social media outlets have been spreading a baseless fake news about my death in a car accident. This has disturbed my family & friends beyond words, and I have been receiving endless calls on this. Please refrain from such things. There was no accident and we are well.
— Mohammad Irfan (@M_IrfanOfficial) June 21, 2020Some social media outlets have been spreading a baseless fake news about my death in a car accident. This has disturbed my family & friends beyond words, and I have been receiving endless calls on this. Please refrain from such things. There was no accident and we are well.
— Mohammad Irfan (@M_IrfanOfficial) June 21, 2020
गतवर्षी नोव्हेंबरमध्ये 38 वर्षीय इरफानने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा शेवटचा सामना खेळला होता. त्याने पाकिस्तानसाठी आतापर्यंत चार कसोटी, 60 एकदिवसीय आणि 22 टी-20 सामने खेळले आहेत. यात त्याच्या नावावर एकूण 109 बळी जमा आहेत.
विशेष म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) ट्विट करून कर्णबधिर क्रिकेटर मोहम्मद इरफान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला होता. मात्र, चाहत्यांनी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानबद्दल हा गैरसमज केला.