मुंबई - भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी आणि षटकारांसाठी ओळखला जातो. त्याचा सहा षटकारांचा विक्रम कोणताही भारतीय चाहता विसरू शकत नाही. २००७मध्ये आजच्याच दिवशी युवराजने संपूर्ण जगाला स्तब्ध करत हा मोठा विक्रम रचला होता.
२००७च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात युवराजने सहा चेंडूत सहा षटकार मारण्याचा विक्रम केला होता. त्या ऐतिहासिक दिवसाला आज १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात युवीने सहा चेंडूंत सहा षटकार ठोकले. हा सामना भारताने जिंकला होता.
-
#YuvrajSingh just look at those sixes.... What an incredible shots ,,, especially the fourth one,, the Full toss balll... What a short yaarr.. It's really amazing pic.twitter.com/TZ38BOj2QR
— Murali Yuvraj (@yuvraj_murali) September 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#YuvrajSingh just look at those sixes.... What an incredible shots ,,, especially the fourth one,, the Full toss balll... What a short yaarr.. It's really amazing pic.twitter.com/TZ38BOj2QR
— Murali Yuvraj (@yuvraj_murali) September 19, 2020#YuvrajSingh just look at those sixes.... What an incredible shots ,,, especially the fourth one,, the Full toss balll... What a short yaarr.. It's really amazing pic.twitter.com/TZ38BOj2QR
— Murali Yuvraj (@yuvraj_murali) September 19, 2020
त्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रॉबिन उथप्पा बाद झाल्यावर युवी फलंदाजीला आला. त्या सामन्यात भारताने २१८ धावा केल्या आणि इंग्लंडवर भारताने १८ धावांनी विजय साकारला होता.
टीम इंडियाच्या नवख्या खेळाडूंनी ही स्पर्धा जिंकली होती. शिवाय, युवराज सिंग या स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. २०११च्या वर्ल्ड कपमध्येही भारताला चॅम्पियन बनवण्यातही ३८ वर्षीय युवीने आपले योगदान दिले. या विश्वचषक स्पर्धेत ३००पेक्षा जास्त धावा आणि १५ बळी घेणारा तो पहिला अष्टपैलू खेळाडू ठरला होता. २०११च्या विश्वचषकात त्याने ३६२ धावा आणि १५ बळी घेतले.
२०१९मध्ये युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. वृत्तानुसार, युवीने बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांना पत्राद्वारे निवृत्ती मागे घेण्याबाबत कळवले आहे.