ETV Bharat / sports

सचिनने आजच्या दिवशी केले होते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण!

३१ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कराची येथून आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली होती.

On this day in 1989: Sachin Tendulkar made his debut in international cricket
सचिनने आजच्या दिवशी केले होते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
author img

By

Published : Nov 15, 2020, 12:39 PM IST

मुंबई - क्रिकेटप्रेमींमध्ये सचिन तेंडुलकर माहीत नसलेला चाहता मिळणे कठीणच. सचिनने आपल्या खेळाच्या जोरावर भारतीय संघाचे नाव जगभरात पोहोचले. ३१ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी सचिनने कराची येथून आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्याने वयाच्या १६व्या वर्षी कराची येथे पहिला कसोटी सामना खेळला होता.

सचिनने १५ नोव्हेंबर १९८९ रोजी पाकिस्तानविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. त्यावेळी पाकिस्तान संघामध्ये वसिम अक्रम, इम्रान खानसारखे वेगवान गोलंदाज होते. सचिन हा भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू होता आणि हा विक्रम अजूनही अबाधित आहे. सचिनने आपल्या कारकीर्दीत ३४ हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा जमवल्या.

पदार्पणाच्या सामन्यात सचिनने केल्या 'इतक्या' धावा

सचिनला आपल्या पदार्पणाच्या सामन्यात १५ धावा करत्या आल्या. वकार युनूसने सचिनला आऊट केले. या कसोटीत सचिन तेंडुलकरला दुसऱ्यांदा फलंदाजीची संधी मिळाली नाही. विशेष बाब म्हणजे, वकार युनूसचा देखील हा पदार्पणाचा सामना होता.

सचिनची कारकीर्द -

सचिन २०० कसोटी सामने खेळणारा आणि १०० आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारा जगातील एकमेव फलंदाज आहे. त्याने कसोटी सामन्यात ५३.७८ च्या सरासरीने आणि ५१ शतकांसह १५ हजार ९२१ धावा केल्या. तर ४६३ एकदिवसीय सामन्यामध्ये ४४.८३ च्या सरासरीने १८ हजार ४२६ धावा बनवल्या. यामध्ये त्याने ४९ शतके आणि ९६ अर्धशतकांचा समावेश आहे. सचिनने २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.

हेही वाचा - Ind Vs Aus : टीम इंडियाचा सराव; BCCI ने शेअर केले फोटो

हेही वाचा - माझ्याविरोधात शॉर्टपिच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला तर पचतावचाल, स्मिथने भारतीय गोलंदाजांना डिवचलं

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.