ऑकलंड - न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आघाडीच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारली. तेव्हा रवींद्र जडेजा आणि नवदीप सैनी यांनी चांगली झुंज दिली. पण त्याची झुंज अखेर अपयशी ठरली. न्यूझीलंडने हा सामना २२ धावांनी जिंकत ३ सामन्याच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली. दरम्यान, भारताच्या पराभवानंतर कर्णधार कोहलीने अजब प्रतिक्रिया दिली.
पराभवानंतर विराट म्हणाला की, 'आजच्या सामन्यात वरच्या फळीतील फलंदाजांनी हाराकिरी करत विकेट फेकल्या. तेव्हा रवींद्र जडेजा आणि नवदीस सैनीने चांगला खेळ केला. या वर्षात आमच्यासाठी कसोटी आणि टी-२० क्रिकेटच्या तुलनेत एकदिवसीय क्रिकेट महत्वाचे नाही. आमचे लक्ष्य कसोटी आणि टी-२० वर आहे.'
आम्ही तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात संघासह रणणितीमध्ये बदल करण्यासाठी विचार करत आहोत. कारण आमच्याकडे गमावण्यासाठी काही नाही. आम्ही अखेरचा सामना निर्धास्त होऊन खेळू. या सामन्यात आम्ही परिणामाची चिंता करणार नाही, असेही विराट म्हणाला.
भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा न्यूझीलंडचा संघ फलंदाजीसाठी उतरला. मार्टिन गुप्टील आणि हेन्री निकोलस यांनी न्यूझीलंडला ९३ धावांची सलामी दिली. दोघे बाद झाल्यानंतर न्यूझीलंडची मधली फळी कोसळली. तेव्हा अनुभवी रॉस टेलरने पदार्पणवीर कायले जॅमिसनला सोबत घेताना नवव्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी केली. या भागिदारीच्या जोरावर न्यूझीलंडला २७३ धावांपर्यंत मजल मारता आली. टेलरने ७४ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ७३ धावांची खेळी केली.
भारतीय संघ जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला. तेव्हा भारताची सुरूवात खराब झाली. दोघे सलामीवीर स्वस्तात बाद झाले. त्यानंतर विराट कोहली, केएल राहुल आणि केदार जाधवही ठरावीक अंतराने बाद झाले. तेव्हा श्रेयस अय्यर (५२), रवींद्र जडेजा (५५) आणि नवदीप सैनी (४५) यांनी चांगली झुंज दिली. पण त्याचे प्रयत्न अपुरे ठरले.
हेही वाचा - IND vs NZ : एकदिवसीय मालिकेत भारताचा सलग दुसरा पराभव, न्यूझीलंडने मालिका जिंकली
हेही वाचा - बुमराहची जादू ओसरली, मागील ५ सामन्यात मिळवला फक्त...