हैदराबाद - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नवीन अध्यक्षाच्या नावाची घोषणा झाली आहे. आयसीसीचे नवे अध्यक्ष म्हणून न्यूझीलंड क्रिकेटचे प्रमुख ग्रेग बार्क्ले यांची निवड झाली आहे. माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांचा कार्यकाळ यावर्षी जुलैमध्ये संपुष्टात आला. त्यानंतर इम्रान ख्वाजा यांना हंगामी अध्यक्ष केले गेले.
बार्क्ले हे २०१२पासून न्यूझीलंड क्रिकेटचे संचालक आहेत. २०१५मध्ये ते आयसीसीचे संचालक देखील होते. आयसीसीचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर बार्क्ले म्हणाले, ''आयसीसीचे अध्यक्ष म्हणून निवड होणे ही माझ्यासाठी मोठ्या अभिमानाची बाब आहे. मला सहकार्य केल्याबद्दल आयसीसीच्या सह संचालकांचे आभार. मला आशा आहे की आम्ही खेळाच्या प्रगतीसाठी एकत्र काम करू.''
-
Greg Barclay has been elected as the new Independent Chair of the International Cricket Council.
— ICC (@ICC) November 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Barclay joins from New Zealand Cricket where he has been a director since 2012 and also served as a director of the 2015 ICC @cricketworldcup.
Read more 👇
">Greg Barclay has been elected as the new Independent Chair of the International Cricket Council.
— ICC (@ICC) November 24, 2020
Barclay joins from New Zealand Cricket where he has been a director since 2012 and also served as a director of the 2015 ICC @cricketworldcup.
Read more 👇Greg Barclay has been elected as the new Independent Chair of the International Cricket Council.
— ICC (@ICC) November 24, 2020
Barclay joins from New Zealand Cricket where he has been a director since 2012 and also served as a director of the 2015 ICC @cricketworldcup.
Read more 👇
आयसीसी बोर्डावर होते कार्यरत -
ग्रेग बार्क्ले हे आयसीसी बोर्डावर न्यूझीलंड क्रिकेटचे प्रतिनिधी होते. परंतु आता ते या पदाचा राजीनामा देतील आणि आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारतील. आयसीसीच्या मतदानात विजय मिळवण्यासाठी उमेदवाराला दोन-तृतीयांश मते मिळवावी लागतात.