माउंट माऊंगानुई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमिसनला सामना शुल्काच्या २५ टक्के दंड ठोठावला आहे. बे-ओव्हल मैदानावर पाकिस्तान विरुद्ध खेळल्या जाणार्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसर्या दिवशी पाकिस्तानचा फलंदाज फहीम अशरफच्या दिशेने चेंडू फेकल्याबद्दल जेमिसनला दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, त्याच्या खात्यात नकारात्मक गुणही जोडला गेला आहे.
हेही वाचा - विंडीजच्या १२ क्रिकेटपटूंचा बांगलादेश दौऱ्याला नकार!
जेमिसन आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.९मध्ये दोषी आढळला. २४ महिन्यांच्या आत जेमिसनचा ही पहिली वाईट वागणूक होती. पाकिस्तानच्या पहिल्या डावातील ७५ व्या षटकात जेमिसन गोलंदाजी करत होता. त्याने स्वतःचा चेंडू अशरफच्या दिशेने फेकला.
ऑन फील्ड पंच ख्रिस गॅफनी आणि वॅनी नाइट आणि तिसरे पंच ख्रिस ब्राउन आणि चौथे पंच सीन हेग यांच्याकडून जेमिसनवर आरोप लावण्यात आला. जेमिसनने आपल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता त्याच्याविरूद्ध कोणत्याही औपचारिक कारवाईची आवश्यकता नाही, असे आयसीसीने सांगितले.