वेलिंग्टन - न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने बांगलादेशविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा केली आहे. यात न्यूझीलंड संघाचा नियमित कर्णधार केन विल्यमसनला दुखापत झाल्याने, संघाची कमान टॉम लाथम याच्याकडे सोपविण्यात आली आहे.
केन विल्यमसनच्या हाताला दुखापत झाली आहे. यामुळे तो बांगलादेशविरूद्धच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. याकारणाने न्यूझीलंड संघाची धुरा लाथमकडे सोपवण्यात आली आहे. न्यूझीलंड बोर्डाने १३ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
-
TEAM NEWS - Maiden ODI squad call-ups for Devon Conway, Will Young and @dazmitchell47 for the three-game Alesha Mart ODI Series against @BCBtigers, starting in @Lovedunedin next week. More | https://t.co/nefget6Djx #NZvBAN pic.twitter.com/l6UKyuw8re
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 10, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">TEAM NEWS - Maiden ODI squad call-ups for Devon Conway, Will Young and @dazmitchell47 for the three-game Alesha Mart ODI Series against @BCBtigers, starting in @Lovedunedin next week. More | https://t.co/nefget6Djx #NZvBAN pic.twitter.com/l6UKyuw8re
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 10, 2021TEAM NEWS - Maiden ODI squad call-ups for Devon Conway, Will Young and @dazmitchell47 for the three-game Alesha Mart ODI Series against @BCBtigers, starting in @Lovedunedin next week. More | https://t.co/nefget6Djx #NZvBAN pic.twitter.com/l6UKyuw8re
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 10, 2021
न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात तीन एकदिवसीय सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना शनिवार (२० मार्च) रोजी डुनेडिन येथील मैदानावर खेळला जाणार आहे. एकदिवसीय मालिकेनंतर उभय संघात तीन सामन्याची टी-२० मालिका देखील होणार आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी असा आहे न्यूझीलंडचा संघ -
ट्रेंट बोल्ट, डेवन कॉनवे, मार्टिन गुप्टिल, मॅट हेन्री, काइल जेमीन्सन, टॉम लाथम (कर्णधार), डेरिल मिशेल, जिमी नीशम, हेन्री निकोलस, मिशेल सेंटनर, टिम साउदी, रॉस टेलर आणि विल यंग.
हेही वाचा - भारतात होणाऱ्या टी-२० विश्व करंडकाचा 'हा' संघ असेल मुख्य दावेदार; इंग्लंडच्या खेळाडूची भविष्यवाणी
हेही वाचा - Video : क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्यामुळे फलंदाजाला ठरवलं बाद; क्रिकेटप्रेमी म्हणतात वादग्रस्त निर्णय