चेन्नई - अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवला. विराट या दौऱ्यातील पहिल्या सामन्यानंतर पॅटर्निटी लिव्हवर मायदेशी परतला होता. यामुळे अजिंक्यकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले होते. आता भारतीय संघ विराटच्या नेतृत्वात इंग्लंडविरुद्ध दोन हात करणार आहे. उभय संघातील या मालिकेला सुरूवात होण्याआधी अजिंक्यने विराटला मदत करण्याचा निश्चिय बोलून दाखवला.
भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी आज (बुधवार) झालेल्या व्हर्चुअल पत्रकार परिषदेत बोलताना अजिंक्य म्हणाला की, 'माझे काम विराटच्या पाठीमागे राहून मदत करण्याचे आहे. हे काम सोप्प आहे. जेव्हा विराटला काही मदतीची गरज असेल तर मी ती करेन. विराट कर्णधार होता आणि तो घरगुती कारणामुळे ऑस्ट्रेलिया दौरा सोडून मायदेशी परतला. यामुळे माझ्याकडे कर्णधारपद आले.'
ऑस्ट्रेलियातील विजय हा भूतकाळ आहे. आता आपण वर्तमानात आहोत. आम्ही इंग्लंड संघाचा सन्मान करतो, कारण त्यांनी श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकली आहे. आमचे सगळे लक्ष फक्त चांगले क्रिकेट खेळण्यावर आहे. आम्ही इंग्लंडला हलक्यात घेणार नाही, असे देखील अजिंक्यने सांगितले.
-
💬 My job becomes easy when @imVkohli is around: @ajinkyarahane88
— BCCI (@BCCI) February 3, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
🗣️🗣️ Vice-captain Rahane on his camaraderie with Captain Virat Kohli & driving #TeamIndia forward 🤜🏻🤛🏻 #INDvENG pic.twitter.com/AW2cNYJ7RP
">💬 My job becomes easy when @imVkohli is around: @ajinkyarahane88
— BCCI (@BCCI) February 3, 2021
🗣️🗣️ Vice-captain Rahane on his camaraderie with Captain Virat Kohli & driving #TeamIndia forward 🤜🏻🤛🏻 #INDvENG pic.twitter.com/AW2cNYJ7RP💬 My job becomes easy when @imVkohli is around: @ajinkyarahane88
— BCCI (@BCCI) February 3, 2021
🗣️🗣️ Vice-captain Rahane on his camaraderie with Captain Virat Kohli & driving #TeamIndia forward 🤜🏻🤛🏻 #INDvENG pic.twitter.com/AW2cNYJ7RP
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला आणखी तीन-चार महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. यामुळे आमचे लक्ष इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या मालिकेवर आहे. न्यूझीलंडने चांगली कामगिरी केली, यामुळे ते अंतिम सामन्याचे हकदार आहेत. आम्ही एकावेळेस एका सामन्यावर अधिक लक्ष देऊ, असे देखील अजिंक्य म्हणाला.
दरम्यान, उभय संघात चार सामन्याची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिला आणि दुसरा सामना चेन्नईमध्ये होणार आहे. तर उर्वरित दोन्ही सामने अहमदाबादमध्ये होतील.
हेही वाचा - IND vs ENG: चेन्नई कसोटीआधी विराटने सराव सत्रात गाळला घाम, पाहा व्हिडिओ
हेही वाचा - श्रीलंका संघाचे प्रशिक्षक ऑर्थरसह लाहिरू थिरिमानेला कोरोनाची लागण