मुंबई - आजपासून एकदिवसीय वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. जगामध्ये सर्वात जास्त क्रिकेटप्रेमी भारतात असून भारतीय संघ हा विजेतेपदाचा प्रमुख दावेदार समजला जात आहे. आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी काही क्रिकेटप्रेमींनी आपल्या चेहऱ्यावर तसेच केसांवर वर्ल्डकपच्या आकाराच्या कलाकृती तयार केल्या आहेत.
आज सकाळपासून अनेक क्रिकेटप्रेमींनी भारतीय संघाला चिअर्स करण्यासाठी आपल्या चेहऱ्यावर आणि केसांवर डिझाईन काढून घेण्यासाठी गर्दी केली होती. अशा या अनोख्या प्रकारच्या कलाकृती काढून घेणार्या क्रिकेटप्रेमींची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. मुंबईतील एका हेअर डिझायनर्सने वर्ल्डकपचा ट्रेंड बघता क्रिकेट प्रेमींच्या केसांवर वर्ल्डकपचे लोगो आणि आवडणाऱ्या खेळाडूंचे नाव त्यांचा केसांवर डिझाईन केली आहे.
मुंबईतील दादर येथील नॅशनल हेअर क्राफ्ट सलूनमध्ये मिलिंद चव्हाण आणि तुषार चव्हाण या प्रसिद्ध हेअर डिझायनर्सनी भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी आज काही क्रिकेटपेमीच्या चेहऱ्यावर भारतीय ध्वज काढलेत. त्याचप्रमाणे सर्वांचे आकर्षण असलेला विश्वचषकाची प्रतिकृतीही एका मुलीच्या डोक्यावर बनवली आहे. तसेच भारतीय संघ जसजसा एक पाऊल विश्व चषकाकडे टाकत जाईल, त्याप्रमाणे सलून मार्फत येणाऱ्या ग्राहकांना सूट देण्यात येईल, असे मिलिंद चव्हाण यांनी सांगितले.
यावर्षी भारतीय संघ वर्ल्डकप आपल्या नावे करेल, असे या हेअर डिझायनर व क्रिकेटप्रेमी चहात्यांना वाटत आहे. त्यामुळे त्यांनी हा असा अनोखा संकल्पना डोक्यात ठेवून वर्ल्डकपच्या निमित्ताने काही वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे. वर्ल्ड कप जिंकण्याआधीच तो मुलांनी भारतात आणला असूव त्यांना विश्वास आहे की यंदाचे जेतेपद भारतीय संघच जिंकेल, असा त्यांना ठाम विश्वास आहे.