शारजाह - आयपीएल-१३च्या अंतिम लीग टप्प्यातील सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा १०गडी राखून धुव्वा उडवला. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहितने प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईची या मोसमातील सर्वात खराब कामगिरी, असे रोहितने म्हटले.
रोहित सामन्यानंतर म्हणाला, "आजचा आपला दिवस नव्हता. बहुधा हा आमचा मोसमातील सर्वात खराब सामना होता. आम्हाला काही गोष्टींचा प्रयोग करायचा होता, परंतु ते यशस्वी झाले नाही. आम्ही आज चांगले क्रिकेट खेळलो नाही." या सामन्यात रोहितने चार धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने आठ गड्यांच्या मोबदल्यात १४९ धावा केल्या.
मार्लन सॅम्युएल्सचा सर्व प्रकारच्या क्रिकेटला रामराम
रोहित म्हणाला, "पुनरागमन केल्याने मला आनंद झाला. पुढील काही सामने खेळण्यासाठी मी उत्साही होतो. पुढे काय होते ते पाहूया. मी आता ठीक आहे. हैदराबादने पॉवरप्लेमध्ये काही चांगले फटके खेळले आणि त्यामुळेच त्यांना मदत झाली. भूतकाळ विसरून वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे चांगले आहे."
मुंबईचा संघ यापूर्वीच प्ले-ऑफमध्ये दाखल झाला आहे. यंदाच्या आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये मुंबईचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होईल. उद्या गुरूवारी हा सामना पार पडेल. रोहित पुढच्या सामन्याबद्दल म्हणाला, "दिल्ली एक चांगली टीम आहे. त्यामुळे त्यांचा सामना करणे आव्हान असेल."