डेहराडून - अफगाणिस्तानने आयर्लंडला चौथ्या एकदिवसीय सामन्यात १०९ धावांनी पाणी पाजले आणि मालिकेत २-१ अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात एक मजेशीर घटना पाहायला मिळाली. अफगाणिस्तानच्या संघात एकाच कुटुंबातील २ सदस्य खेळताना दिसून आले. विशेष म्हणजे ते दोघेही नात्याने काका-पुतण्या आहेत. यांच्याविषयी जाणून घेऊया.
अफगाणिस्तानचा युवा गोलंदाज मुजीब-उर-रहेमान हा त्याचा मामा नूर अली जदरानसह आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरले. मुजीबचे वय १७ तर नूर अली जदरान यांचे वय ३१ आहे. यापूर्वी ते दोघे २०१७ साली आयर्लंडविरुद्ध एकत्र खेळले होते. त्यावेळी मुजीब हा केवळ १५ वर्षाचा होता. क्रिकेटमध्ये या आधीही एकाच परिवारातील दोन सदस्य एकत्र खेळताना दिसून आले आहेत.
या सामन्यात नूर अली जदरान याने १२ चेंडूत ९ धावा केल्या. तर त्याचा पुतण्या मुजीब ने ८ षटकात २५ धावा देत २ गडी बाद केले. मुजीब २०१८ साली आयपीएलमध्ये आला तेव्हा अचानक प्रसिध्दीच्या झोतात आला. पंजाबने त्याला ४ कोटी रुपयात विकत घेतले. मागील वर्षी ११ सामन्यांत १४ गडी बाद केले. यंदाही तो किंग्ज एलेव्हन पंजाबच्या संघात खेळताना दिसून येईल.