मुंबई - इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा रोमांच काही दिवसांत पाहयाला मिळणार आहे. यात भारताचे ३ स्टार खेळाडू एम.एस. धोनी, सुरेश रैना आणि रोहित शर्मा यांच्या एका विक्रमासाठी चुरस पाहायला मिळत आहे. या तिघांनाही २०० षटकार मारण्याची संधी आहे.
माजी कर्णधार एम. एस धोनीने आयपीएलच्या इतिहासात १८६ षटकार खेचले आहेत. लीगमध्ये सर्वात जास्त षटकार खेचण्यात तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्टायलिश फलंदाज सुरेश रैना १८५ षटकारांसह चौथ्या स्थानावर आहे. याचसोबत रैना आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. तर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा १८४ षटकरांसह पाचव्या स्थानी आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये या तिघांना २०० षटकार मारण्याची संधी आहे.
आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त षटकार खेचण्याचा विक्रम विंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याच्या नावावर आहे. त्याने ११२ सामन्यात २९२ षटकार ठोकून या यादीत पहिल्या स्थानी विराजमान आहे.
मिस्टर ३६० डिग्रीच्या नावाने प्रसिध्द असलेला दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डीविलियर्स हा १४१ सामन्यात १८६ षटकारांसह दुसऱ्या स्थानी आहे. महेंद्र सिंह धोनी १७५ सामन्यात १८६ षटकारांसह तिसऱ्या स्थानी आहे.