मुंबई - आयपीएलच्या आगामी हंगामाची सुरुवात २३ मार्चला होत आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी संघ म्हणून चेन्नई सुपर किंग्सचे नाव घेतले जाते. चेन्नईला सर्वात यशस्वी संघ बनवण्याचे श्रेय हे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला दिले जाते. परंतु, चेन्नईला२०१६ आणि २०१७ साली स्पॉट फिक्सिंगच्या कारणामुळे निलंबित करण्यात आले होते. आता धोनीने प्रथमच या विषयावर बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
Watch how @msdhoni and a bunch of men in yellow jerseys wrote one of India's greatest comeback stories. #HotstarSpecials is proud to present #RoarOfTheLion. Trailer out. pic.twitter.com/nkWpV1EPnl
— Hotstar Specials (@HotstarSpecials) March 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Watch how @msdhoni and a bunch of men in yellow jerseys wrote one of India's greatest comeback stories. #HotstarSpecials is proud to present #RoarOfTheLion. Trailer out. pic.twitter.com/nkWpV1EPnl
— Hotstar Specials (@HotstarSpecials) March 10, 2019Watch how @msdhoni and a bunch of men in yellow jerseys wrote one of India's greatest comeback stories. #HotstarSpecials is proud to present #RoarOfTheLion. Trailer out. pic.twitter.com/nkWpV1EPnl
— Hotstar Specials (@HotstarSpecials) March 10, 2019
आयपीएलच्या पूर्वसंध्येला २० मार्चपासून धोनीवर एक डॉक्यूमेंट्री रिलीज होत आहे. रोअर ऑफ दी लायन या डॉक्यूमेंट्रीच्या सुरुवातीलाच धोनी म्हणतो, की माझ्यासाठी सर्वात मोठा अपराध हत्या करणे नाही तर, मॅच फिक्सिंग ठरेल. ४५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये धोनी म्हणतो, संघ मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी होता. माझ्यावरही आरोप झाले होते. आम्हा सर्वांसाठी हा कठीण काळ होता. पुनरागमन करतानाचा क्षण चाहते आणि आमच्यासाठी खूप भावूक होता. मी याआधीही म्हटले आहे, ज्या गोष्टीमुळे तुमचा मृत्यू होत नाही, ती गोष्ट तुम्हाला मजबूत बनवते.
स्पॉट फिक्सिंगमुळे चेन्नईच्या खेळाडूंना दुसऱया संघांकडून २ वर्षे खेळावे लागले होते. महेंद्रसिंह धोनी २ वर्ष रायझिंग पुणे सुपरजाएंट्स संघाकडून खेळला. पहिल्यावर्षी खराब कामगिरी झाल्यामुळे धोनीला कर्णधारपदावरून हटवण्यात आले. त्याच्याऐवजी स्मिथला कर्णधार करण्यात आले होते. यावरुन बरीच चर्चा रंगली होती. चेन्नईच्या संघाने जोरदार पुनरागमन करताना धोनीच्या नेतृत्वात गेल्यावर्षी आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.