मुंबई - भारतीय संघाचा माजी यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी धोनीला निवृत्तीसंदर्भात एक विशेष पत्र लिहिलं आहे. मोदींचे ते पत्र धोनीनेच ट्विटवरुन शेअर केले आहे. या पत्रात मोदींनी धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींच्या या शुभेच्छांचा स्वीकार करत धोनीने मोदींना 'थँक यू' म्हटलं आहे.
-
An Artist,Soldier and Sportsperson what they crave for is appreciation, that their hard work and sacrifice is getting noticed and appreciated by everyone.thanks PM @narendramodi for your appreciation and good wishes. pic.twitter.com/T0naCT7mO7
— Mahendra Singh Dhoni (@msdhoni) August 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">An Artist,Soldier and Sportsperson what they crave for is appreciation, that their hard work and sacrifice is getting noticed and appreciated by everyone.thanks PM @narendramodi for your appreciation and good wishes. pic.twitter.com/T0naCT7mO7
— Mahendra Singh Dhoni (@msdhoni) August 20, 2020An Artist,Soldier and Sportsperson what they crave for is appreciation, that their hard work and sacrifice is getting noticed and appreciated by everyone.thanks PM @narendramodi for your appreciation and good wishes. pic.twitter.com/T0naCT7mO7
— Mahendra Singh Dhoni (@msdhoni) August 20, 2020
मोदींनी आपल्या पत्रात काय म्हटलं आहे -
महेंद्रसिंह धोनी अनपेक्षित निर्णय घेण्यात माहीर आहे. त्याने निवृत्तीदेखील अचानक जाहीर केली. याचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, '१५ ऑगस्ट रोजी तू तुझ्या ट्रेडमार्क स्टाइलमध्ये म्हणजेच अनपेक्षितपणे एक लहान व्हिडिओ शेअर केला. त्यानंतर देशभरामध्ये चर्चा सुरु झाली. १३० कोटी भारतीय निराश झाले. मात्र त्याचवेळी ते तुझे आभारीही आहेत. मागील दीड दशकामध्ये तू भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ते सर्व तुझे आभारी आहेत.'
तू सर्वात यशस्वी कर्णधार ठरलास. भारताला अग्रेसर बनवण्यामध्ये तू मोलाचे योगदान दिलं. इतिहासामध्ये तुझे नाव सर्वोत्तम फलंदाज आणि सर्वोत्तम कर्णधार आणि या खेळातील सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणून नोंदवले जाईल. कठीण प्रसंगी तिच्यावर निर्भर राहणे आणि सामना संपवण्याची तुझी शैली, खास करुन २०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना सर्व सामान्यांच्या मनावर कायमचा कोरला गेला आहे. तो पुढील अनेक पिढ्यांना लक्षात राहील, असे पंतप्रधान मोदी म्हणतात.
धोनीच्या हेअरस्टाईलबद्दल काय म्हणाले मोदी -
मोदींनी धोनीच्या शांत आणि संयमी वृत्तीचे कौतूक केले. यानंतर धोनीच्या हेअरस्टाईल विषयी मोदी म्हणाले की, कोणती हेअरस्टाईल आहे, यापेक्षा धोनी तुझा शांत स्वभाव आणि संयमी वृत्ती ही युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल. दरम्यान, धोनी आपल्या हेअरस्टाईलमुळे चर्चेत असायचा. सुरूवातीच्या काळात धोनीच्या लांब केसाच्या हेअरस्टाईलच्या प्रेमात पाकिस्तानचे पंतप्रधान परवेझ मुशर्फही पडले होते. त्यांनी धोनीच्या हेअरस्टाईलचे कौतूक केले होते.
पुढे मोदी म्हणाले की, धोनी तुझे यश करोडो युवांसाठी प्रेरणा देणारे आहे. जे मोठ्या शाळा किंवा कॉलेजमध्ये जाऊ शकले नाहीत किंवा श्रीमंत कुटुंबातील नाहीत. पण त्यांच्यात प्रतिभा आहे. अशासाठी धोनी प्रेरणास्थान आहे. खेळाबरोबरच धोनीकडे त्याच्या खडतर प्रवासासाठी आणि प्रेरणास्थान म्हणून पाहिले जाईल.'
धोनी, तुझे सुरक्षा दलाच्या जवानांबद्दल विशेष प्रेम आहेत. तू त्यांच्यासोबत असतानाही खूपच आनंदी असतो. त्यांच्यासाठीच्या अनेक कामांमध्ये तुला चिंता असते, हे खरोखरच कौतुकास्पद आहे, असेही मोदींनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
शेवटी मोदींनी, साक्षी आणि झिवाला तुझ्याबरोबर अधिक वेळ मिळो. मी त्या दोघींनाही शुभेच्छा देतो. कारण त्यांनी केलेली तडजोड आणि पाठिंब्याशिवाय काहीच शक्य नव्हतं. पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमध्ये संयम कसा ठेवावे हे तरुणांनी तुझ्याकडून शिकण्यासारखं आहे. मला आठवतं एका मालिकेमध्ये विजय मिळवल्यानंतर सर्वजण विजयाची आनंद साजरा करत असताना तू तुझ्या मुलीबरोबर खेळत होता. खरोखरच तो व्हिंजेट धोनी होता. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, असे सांगत पत्राचा शेवट केला आहे.