चेन्नई - भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करतो. धोनीने आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या तयारीला सुरूवात केली आहे. चेन्नईत ट्रेनिंग कॅपसाठी आलेल्या धोनीचे हॉटेल स्टाफकडून जोरदार स्वागत करण्यात आले. धोनीच्या जंगी स्वागताचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे.
चेन्नईचे सीईओ के एस विश्वनाथन यांनी सांगितले की, ९ मार्चपासून चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या ट्रेनिंग कॅपला सुरूवात होणार आहे. यात उपलब्ध खेळाडू सहभागी होणार आहेत. धोनी या ट्रेनिंग कॅपमध्ये सहभागी होण्यासाठी चेन्नईत दाखल झाला आहे. त्याचे हॉटेल स्टाफने जोरदार स्वागत केले. धोनीच्या जंगी स्वागताचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
-
The Singa Nadai to start off the day with! Thala Coming! #DenComing #WhistlePodu #Yellove 💛🦁 @msdhoni pic.twitter.com/nu6XOmJ8qo
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 4, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The Singa Nadai to start off the day with! Thala Coming! #DenComing #WhistlePodu #Yellove 💛🦁 @msdhoni pic.twitter.com/nu6XOmJ8qo
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 4, 2021The Singa Nadai to start off the day with! Thala Coming! #DenComing #WhistlePodu #Yellove 💛🦁 @msdhoni pic.twitter.com/nu6XOmJ8qo
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 4, 2021
धोनी पुढील पाच दिवस त्या हॉटेलमध्ये क्वारंटाइन राहणार आहे. यादरम्यान त्याची कोरोना चाचणी करण्यात येईल. यात त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तो सरावाला सुरूवात करेल. अंबाती रायुडू देखील या ट्रेनिंग कॅपमध्ये सहभागी होणार आहे. दरम्यान, चेन्नई संघाने यंदाच्या आयपीएल लिलावात मोईन अली आणि कृष्णप्पा गौतम यांच्यावर मोठी बोली लावत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आहे.
हेही वाचा - IND Vs ENG ४th Test : इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांवर आटोपला
हेही वाचा - टी-२० क्रिकेटमध्ये एका षटकात ६ षटकार; 'या' ५ खेळाडूंनी केला पराक्रम