चेन्नई - आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे चेन्नईत आगमन झाले आहे. कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर, धोनीने आज चेन्नई गाठली. तो आता चेन्नईत आठवडाभर सरावशिबिराला उपस्थिती नोंदवेल. चेन्नई प्रवासादरम्यान त्याच्यासोबत सीएसकेतील सुरेश रैना, दीपक चहर, पीयूष चावला, आणि कर्ण शर्मा उपस्थित होते.
-
#Dhoni With Super Kings. 🤩💛🔥#MSDhoni | @MSDhoni pic.twitter.com/jAKXZRfRdC
— DHONIsm™ ❤️ (@DHONIism) August 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#Dhoni With Super Kings. 🤩💛🔥#MSDhoni | @MSDhoni pic.twitter.com/jAKXZRfRdC
— DHONIsm™ ❤️ (@DHONIism) August 14, 2020#Dhoni With Super Kings. 🤩💛🔥#MSDhoni | @MSDhoni pic.twitter.com/jAKXZRfRdC
— DHONIsm™ ❤️ (@DHONIism) August 14, 2020
कोरोनामुळे यंदाच्या आयपीएलचे आयोजन १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणार आहे. चेन्नईतील शिबिरापूर्वी, धोनीने त्याचा संघसहकारी मोनू कुमार सिंग याच्यासोबत ही चाचणी केली.
-
Welcome to Chennai @MSDhoni !❤#Dhoni | #WhistlePodu pic.twitter.com/ESsJWUBFYg
— DHONI Army TN™ (@DhoniArmyTN) August 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Welcome to Chennai @MSDhoni !❤#Dhoni | #WhistlePodu pic.twitter.com/ESsJWUBFYg
— DHONI Army TN™ (@DhoniArmyTN) August 14, 2020Welcome to Chennai @MSDhoni !❤#Dhoni | #WhistlePodu pic.twitter.com/ESsJWUBFYg
— DHONI Army TN™ (@DhoniArmyTN) August 14, 2020
धोनी गेल्या वर्षभरापासून क्रिकेट खेळलेला नाही. तो या आयपीएलद्वारे क्रिकेटच्या मैदानावर एका वर्षानंतर पाऊल ठेवणार आहे. आयपीएलमध्ये धोनी कशी कामगिरी करतो यावरच त्याचे भारतीय संघातील भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे ही स्पर्धा धोनीसाठी खूप महत्त्वाची मानली जात आहे.
बीसीसीआयने बनवलेल्या स्टँडर्ड ऑपरेटिंग मानकांनुसार, (एसओपी)चेन्नईला पोहोचल्यानंतर खेळाडूंची पुन्हा एकदा चाचणी केली जाईल. बीसीसीआयने २० ऑगस्टनंतरच संघांना यूएईला जाण्यास सांगितले आहे.