ETV Bharat / sports

आयपीएलसाठी 'थाला' चेन्नईत दाखल, नवीन लुक ठरतोय सोशल मीडियावर 'किलर' - महेंद्रसिंह धोनी आयपीएल २०२० न्यूज

यंदा धोनी आयपीएलदरम्यान मिशी धारण करणार असल्याचे म्हटले जात आहे. धोनीची स्टायलिस्ट सपना भवानीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून धोनीच्या लूकची माहिती दिली.

MS Dhoni arrives in Chennai for IPL 2020 training camp
आयपीएलसाठी 'थाला' चेन्नईत दाखल, नवीन लुक ठरतोय सोशल मीडियावर 'किलर'
author img

By

Published : Mar 2, 2020, 8:11 AM IST

चेन्नई - भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी जेवढा क्रिकेटसाठी ओळखला जातो तसाच तो त्याच्या विविध लूकसाठी नावाजला जातो. त्यामुळे त्याचे नवीन लूक सोशल मीडिया आणि जनसामान्यांमध्ये 'हिट' ठरत असतात. आगामी आयपीएल स्पर्धेतही धोनी एक नवीन लूक घेऊन येणार आहे.

हेही वाचा - खेलो इंडिया..! द्युतीला दुसरे सुवर्ण तर, मुंबईच्या कीर्ती भोईटेला रौप्यपदक

यंदा धोनी आयपीएलदरम्यान मिशी धारण करणार असल्याचे म्हटले जात आहे. धोनीची स्टायलिस्ट सपना भवानीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून धोनीच्या लूकची माहिती दिली.

आयपीएलचा आगामी हंगाम २९ मार्चपासून सुरू होत आहे. या हंगामाचा पहिला सामना गतविजेत्यामुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. तत्पूर्वी, ३८ वर्षीय धोनी आज सोमवारपासून चेन्नईच्या एम.ए चिदंबरम स्टेडियममध्ये प्रशिक्षण सुरुवात करणार आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने रविवारी 'विश्वकरंडक विजेता कर्णधार' शहरात दाखल झाल्याचा फोटो ट्विट करून चाहत्यांना माहिती दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.