ETV Bharat / sports

'कांटा लगा' नंतर 'उमराव' जान बनली हसीन जहाँ, पाहा शमीच्या पत्नीची अदाकारी - हसीन जहाँ उमराव जान व्हिडिओ

हसीन जहाँने शेअर केलेला एक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत हसीन जहाँ उमराव जानच्या 'इन आंखो की मस्ती के' या गाण्यावर अदाकारी सादर करताना दिसत आहे.

mohammed shami wife hasin jahan posts another dance videos on umrao jaan character
'कांटा लगा' नंतर 'उमराव' जान बनली हसीन जहाँ, पाहा शमीच्या पत्नीची अदाकारी
author img

By

Published : May 21, 2020, 7:34 PM IST

मुंबई - भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ सोशल मीडियावर अ‌ॅक्टिव्ह असते. ती नेहमी इंस्टाग्रामवर टिक टॉक व्हिडिओ पोस्ट करताना दिसून येते. या व्हिडिओवरून अनेकदा तिला नेटिझन्सनी ट्रोलही केलं आहे. अशात तिने आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात ती उमराव जान लूकमध्ये पाहायला मिळत आहे. या लूकने तिचे चाहते मात्र, घायाळ झाले आहेत.

हसीन जहाँने शेअर केलेला एक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत हसीन जहाँ उमराव जानच्या 'इन आंखो की मस्ती के' या गाण्यावर अदाकारी सादर करताना दिसत आहे.

हसीन जहाँने याआधी बिकिनीवरील फोट फोटोशूटचा व्हिडिओ पोस्ट केला होता. यावरुन ट्रोलर्संनी तिच्यावर खालच्या थराची टीका केली होती. त्यापूर्वी हसीन जहाँने 'कांटा लगा' या डान्स नंबरवर एक व्हिडिओ केला होता. या व्हिडिओवरूनही ट्रोलर्सनी तिला सुनावले होते.

दरम्यान, मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ एकत्र राहत नाही. हसीन जहाँने शमीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच शमीचे कुटुंबीय आपला छळ करत असल्याचा दावा करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याशिवाय शमीने फिक्सिंगही केल्याचा गंभीर आरोपही तिनं केला होता. या प्रकरणी बीसीसीआयने चौकशी करून शमीला क्लिन चिट दिली. सध्या शमी-हसीन यांच्यातील वाद न्यायालयात आहे.

हेही वाचा - अम्फान चक्रीवादळाचा कहर, विराटसह क्रिकेटपटूंनी खेळाडूंनी केली पीडितांसाठी प्रार्थना

हेही वाचा - आयपीएल 2020 बाबत बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरींनी दिली महत्वपूर्ण अपडेट, वाचा काय म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.