मुंबई - लॉकडाऊनमध्ये मजुरांची मदत करण्यासाठी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी रस्त्यावर उतरलेला आहे. तो स्थलांतरित मजुरांना रेशन देत असल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लॉकडाऊनच्या काळात मजूर मिळेल त्या मार्गाने आपापल्या गावी परतण्यासाठी निघाले आहे. भारतीय रेल्वेने श्रमिक ट्रेन सुरू केल्या असल्या तरी अनेक मजूर अजूनही पायी घरी जात असल्याचे दिसत आहे. या मजुरांसाठी शमी स्वतः रस्त्यावर उतरला आहे. तो या मजुरांना रेशन आणि फळे वाटत आहे. याचा व्हीडिओ व्हायरल झाला असून शमीच्या कामाचे कौतुक नेटीझन्स करीत आहेत.
-
Amroha Me Sarkar Filling Center (HP Petrol Pump) Pr @Umeshnni Sr or Cricketer @MdShami11 Ne Lag Bhag 200 Logon Ko Rashan Dekar Madad Ki....@hpcl_retail @HPCL @Hpcl_MeerutRo @Praveen56172852 @dpradhanbjp pic.twitter.com/3uVf9Nhl3U
— M.Fahad (@Md__Fahad) June 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Amroha Me Sarkar Filling Center (HP Petrol Pump) Pr @Umeshnni Sr or Cricketer @MdShami11 Ne Lag Bhag 200 Logon Ko Rashan Dekar Madad Ki....@hpcl_retail @HPCL @Hpcl_MeerutRo @Praveen56172852 @dpradhanbjp pic.twitter.com/3uVf9Nhl3U
— M.Fahad (@Md__Fahad) June 1, 2020Amroha Me Sarkar Filling Center (HP Petrol Pump) Pr @Umeshnni Sr or Cricketer @MdShami11 Ne Lag Bhag 200 Logon Ko Rashan Dekar Madad Ki....@hpcl_retail @HPCL @Hpcl_MeerutRo @Praveen56172852 @dpradhanbjp pic.twitter.com/3uVf9Nhl3U
— M.Fahad (@Md__Fahad) June 1, 2020
मागील महिन्यात पायी जाणारा एक मजूर शमीच्या घरासमोर चक्कर येऊन पडला होता. शमीने लगेचच त्याला मदत केली आणि खाण्यासाठी अन्न दिले. शमीचे घर नॅशनल हायवेपासून जवळच आहे.
जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातले असून जगभरातील 63 लाख 65 हजार 173 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. 3 लाख 77 हजार 397 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून जगभरातील 29 लाख 3 हजार 382 नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांमध्ये भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. ही चिंतेची बाब आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी 95 हजार 754 रुग्ण बरे झाले आहेत, तर 5 हजार 608 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - भारतीय क्रिकेटर मनोज तिवारीच्या बायकोने सोशल मीडियावर दिल्या शिव्या
हेही वाचा - गंभीर आणि आफ्रिदीने वाक् युद्ध संपवून शांत राहावे, वकार मास्तरांचा सल्ला