मेलबर्न - अफगाणिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू आणि सध्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा मोहम्मद नबी बिग बॅश लीगच्या (बीबीएल) दहाव्या सत्रात मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळणार आहे. क्लबसह हा नबीचा चौथा हंगाम असेल. त्याने रेनेगेड्सकडून २७ सामने खेळले आहेत.
"मी नेहमी रेनेगेड्सबरोबर माझा आनंदी काळ घालवला आहे. टी-२० मधील काही मोठ्या नावांविरूद्ध मी माझी परीक्षा घेतली आहे. चौथ्या हंगामात मी संघात सहभागी झाल्याने मला आनंद झाला आहे", असे नबीने सांगितले. बीबीएलचा दहावा हंगाम ३ डिसेंबरपासून सुरू होत आहे.
-
We all need a bit of good news in 2020. The return of @MohammadNabi007 is just that #GETONRED pic.twitter.com/uBnealDR4f
— Melbourne Renegades (@RenegadesBBL) October 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">We all need a bit of good news in 2020. The return of @MohammadNabi007 is just that #GETONRED pic.twitter.com/uBnealDR4f
— Melbourne Renegades (@RenegadesBBL) October 21, 2020We all need a bit of good news in 2020. The return of @MohammadNabi007 is just that #GETONRED pic.twitter.com/uBnealDR4f
— Melbourne Renegades (@RenegadesBBL) October 21, 2020
संघाचे प्रशिक्षक मायकेल क्लिन्झ नबीविषयी म्हणाले, "विविधतेमुळे नबी संघातील एक मौल्यवान खेळाडू आहे. कोणत्याही परिस्थितीत तो फलंदाजी करू आणि गोलंदाजी करू शकतो. त्याला खेळाची चांगली जाण आहे. मधल्या फळीत नबी पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. त्याला काही महत्त्वाच्या षटकांमध्ये गोलंदाजी करावी लागेल.''