मुंबई - महेंद्रसिंह धोनी संघ निवडताना पक्षपातीपणा करायचा, असा गंभीर आरोप भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी केले होते. त्यांच्या या आरोपाचे खंडन भारताचा माजी फलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफने केले आहे. कैफला एका सोशल मीडिया लाईव्हमध्ये याविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने या आरोपात काही तथ्य नसल्याचे सांगितले.
मोहम्मद कैफ म्हणाला, 'युवी वडील योगराज सिंह यांनी केलेल्या आरोपात मला काही तथ्य वाटत नाही. युवी मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा अनुभवी फलंदाज होता. त्याला आणखी संधी मिळायला हव्या होत्या. पण, भारतीय संघात जेव्हा एखाद्या खेळाडूचा फॉर्म बिघडतो आणि त्याचे प्रदर्शन खराब ठरते. तेव्हा त्याला भारतीय संघातील आपले स्थान गमवावे लागते.'
भारतातील अनेक प्रतिभावान खेळाडू टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी आतोनात प्रयत्न करत आहेत. अशात भारतीय संघातील कोणताही खेळाडू असो, त्याचा फॉर्म बिघडल्यास त्याला जास्त काळ संघात टिकून राहणे कठीण ठरते, असेही कैफ म्हणाला.
योगराज यांचे धोनीवरील आरोप निराधार असून धोनी कसोटी क्रिकेटचा यशस्वी कर्णधार आहे. धोनीचे विक्रम उल्लेखनीय आहेत. त्याने भारतीय संघाला अनेक मालिका जिंकून दिल्या आहेत. यामुळे संघ निवडकर्ता त्याला पूर्णपणे स्वातंत्र्य देतात आणि त्याच्या निर्णयाचा सन्मान करतात. यामुळे याला पक्षपातीपणा म्हणणे योग्य ठरत नाही, असेही कैफ पुढे बोलताना म्हणाला.
हेही वाचा - “मुलाला वडिलांना परत कधी पाहता येईल?”, सानियाने व्यक्त केली चिंता
हेही वाचा - ...तरीही मागील ७० वर्षांपासून काश्मीरची भीक मागत आहात, गंभीरने आफ्रिदीला सुनावले