ETV Bharat / sports

VIDEO : चेंडू आणण्यासाठी क्रिकेटपटूची 'पार्किंग लॉट'मध्ये धाव! - marsh fetches ball from parking

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत हा किस्सा घडला. इंग्लंडचा फलंदाज सॅम बिलिंग्जने खेचलेला षटकार पार्किंग लॉटमध्ये गेला. हा चेंडू आणण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्शला पार्किंग लॉटपर्यंत चालत जावे लागले.

Mitchell marsh walks into parking area to fetch ball following a six by sam billings
VIDEO : चेंडू आणण्यासाठी क्रिकेटपटूची 'पार्किंग लॉट'मध्ये धाव!
author img

By

Published : Sep 12, 2020, 5:23 PM IST

मँचेस्टर - ऑस्ट्रेलियाने टी-२० मालिकेतील पराभव विसरून एकदिवसीय मालिकेची विजयी सुरूवात केली. इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाने १९ धावांनी जिंकला. या सामन्यात इंग्लंडकडून सॅम बिलिंग्जने शानदार शतक झळकावले. पण तो संघाला विजयी करण्यात अपयशी ठरला. मात्र, त्याने या सामन्यात खेचलेला एक षटकार सर्वांच्याच लक्षात राहिला.

इंग्लंडच्या फलंदाजीच्या डावातील २७वे षटक ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने टाकले. या षटकातील एका चेंडूवर बिलिंग्जने षटकार मारला. यानंतर हा चेंडू आणण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्शला पार्किंग लॉटपर्यंत चालत जावे लागले. कोरोनामुळे सध्या प्रेक्षकांशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले जात आहे. त्यामुळे फलंदाजांनी स्टँड्समध्ये टोलावलेला चेंडू क्षेत्रक्षकांनाच आणावा लागत आहे. बिलिंग्ज मिचेल मार्शच्याच गोलंदाजीवर वॉर्नरकडे झेल देऊन बाद झाला. बिलिंग्जने ११० चेंडूत १४ चौकार आणि २ षटकारासह ११८ धावा केल्या.

ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात खेळवण्यात आलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक गमावत, प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ९ बाद २९४ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा संघ ९ बाद २७५ धावा करू शकला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह ३ सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. जोश हेजलवुड सामनावीर ठरला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.