वेलिंग्टन - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केलं. तेव्हा देशभरातील नागरिकांनी याला उर्त्स्फुतपणे पाठिंबा देत कर्फ्यू पाळला. सद्या मोदींच्या या जनता कर्फ्यूची चर्चा जगभरात रंगली आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक माइक हेसन यांनी मोदी यांच्या संकल्पनेचं कौतूक केलं आहे.
हेसन यांनी मुंबईच्या बांद्रा-वरळी सी लिंकचा व्हिडिओ ट्विट करत पंतप्रधान मोदींचे कौतुक केलं आहे. त्यात ते म्हणतात की, 'अनेक वर्षे मी हॉटेलच्या खिडकीतून हे दृश्य पहिलं आहे. या मार्गावर नेहमी १००० हून अधिक गाड्यांची वाहतूक होत असते. पण भारतात आज कोरोनाविरुद्ध १४ तासांसाठी जनता कर्फ्यू होता. याचं पालन योग्य तऱ्हेने करण्यात आल्याचे दिसत आहे.'
-
Have seen this view many times from my hotel room over the years but not with less than 1000 cars on it........#India is having a curfew today for 14 hours to fight #covid_19 it’s looks like it’s being followed 🙏🙏🙏
— Mike Hesson (@CoachHesson) March 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
.
.#jantacurfew #modi #stayathome #corona #covid_19 #seagate pic.twitter.com/KsY5adOjQX
">Have seen this view many times from my hotel room over the years but not with less than 1000 cars on it........#India is having a curfew today for 14 hours to fight #covid_19 it’s looks like it’s being followed 🙏🙏🙏
— Mike Hesson (@CoachHesson) March 22, 2020
.
.#jantacurfew #modi #stayathome #corona #covid_19 #seagate pic.twitter.com/KsY5adOjQXHave seen this view many times from my hotel room over the years but not with less than 1000 cars on it........#India is having a curfew today for 14 hours to fight #covid_19 it’s looks like it’s being followed 🙏🙏🙏
— Mike Hesson (@CoachHesson) March 22, 2020
.
.#jantacurfew #modi #stayathome #corona #covid_19 #seagate pic.twitter.com/KsY5adOjQX
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेसन यांच्या ट्विटला उत्तर दिले. ते म्हणतात की, 'तुम्ही (बांद्रा-वरळी ) लिंक पाहू शकता का? असं वाटत की, लोकं कोरोनाला समूळ नष्ट करण्यासाठी तयार आहेत.
-
Can you see the link?
— Narendra Modi (@narendramodi) March 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Looks like people have closed ranks to uproot the COVID-19 menace. #JantaCurfew https://t.co/Sk3zpolbdY
">Can you see the link?
— Narendra Modi (@narendramodi) March 22, 2020
Looks like people have closed ranks to uproot the COVID-19 menace. #JantaCurfew https://t.co/Sk3zpolbdYCan you see the link?
— Narendra Modi (@narendramodi) March 22, 2020
Looks like people have closed ranks to uproot the COVID-19 menace. #JantaCurfew https://t.co/Sk3zpolbdY
हेसन इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर बंगळुरूचे प्रशिक्षक आहेत. आज पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला देशभरामधून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. सांयकाळी ५ वाजता देशवासियांनी टाळ्या-थाळ्या अन् घंटेचा नाद करत कोरोना विषाणू प्रादुर्भावासंदर्भात जनजागृती निर्माण करणाऱ्याचे आभार व्यक्त केले. जनतेसह राज्यांचे मुख्यमंत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कोरोनाशी लढणाऱ्यांना टाळ्या वाजवून सलामी दिली.
दरम्यान, चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे १२ हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगातील १५० हून अधिक देशांमध्ये याचा फैलाव झाला असून भारतातही कोरोनाबाधितांची संख्या ४०० च्या घरात पोहोचली आहे. तर देशात कोरोनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - जनता कर्फ्यूला महिला हॉकी खेळाडूंकडून भन्नाट प्रतिसाद, पाहा व्हिडिओ
हेही वाचा - जनता कर्फ्यू : सचिनसह क्रीडा विश्वातून खऱ्या हिरोंचे कौतुक, पाहा व्हिडिओ