ETV Bharat / sports

सरफराजचे नेतृत्व कमकुवत, त्याचे कर्णधारपद काढा; प्रशिक्षक आर्थरची मागणी - captaincy

सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सदस्यांना एक प्रस्ताव दिला आहे. त्यामध्ये आर्थर यांनी एकदिवसीय आणि टी-२० सामन्यासाठी संघाचे कर्णधारपद शादाब खान याकडे तर कसोटीचे नेतृत्व बाबर आझम याच्याकडे देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

सरफराजचे नेतृत्व कमकुवत, त्याचे कर्णधारपद काढा; प्रशिक्षक आर्थरची मागणी
author img

By

Published : Aug 5, 2019, 7:49 PM IST

कराची - सरफराज अहमदला कर्णधार पदावरुन हटवा, अशी मागणी संघाचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला केली आहे. तसेच संघाला सर्वोत्तम बनवण्यासाठी मला आणखी दोन वर्षाचा अवधी द्या, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरी गाठू शकला नाही. यामुळे सरफराज याची कर्णधारपदावरुन हकालपट्टी करण्यात येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सदस्यांना एक प्रस्ताव दिला आहे. त्यामध्ये आर्थर यांनी एकदिवसीय आणि टी-२० सामन्यासाठी संघाचे कर्णधारपद शादाब खान याकडे तर कसोटीचे नेतृत्व बाबर आझम याच्याकडे देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

तसेच सूत्राच्या माहितीप्रमाणे, आर्थर यांनी सरफराजचे संघ नेतृत्व कमकुवत असल्याचे सांगितले आहे. यामुळे सरफराज याची कर्णधारपदावरुन हकालपट्टी करण्यात येईल, असे बोलले जात आहे. मिकी आर्थर यांनी २०१६ मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा पदभार स्वीकारला होता. त्याचा कार्यकाल १५ ऑगस्टला संपणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पीसीबी आर्थरच्या कामगिरीवर संतुष्ट नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Intro:Body:

spo

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.