अबुधाबी - आयपीएलच्या तेराव्या हंगामाला आजपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात शेख झायेद स्टेडियमध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वी, मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने चेन्नईविरुद्ध खेळण्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. धोनीच्या नेतृत्वातील सीएसके संघाविरुद्ध खेळणे मी पसंद करतो, असे रोहितने सांगितले.
मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हँडलवर प्रसिद्ध झालेल्या व्हिडीओमध्ये रोहित म्हणाला, "चेन्नई विरुद्ध खेळणे नेहमीच मजेदार असते. आम्ही या सामन्याचा आनंद घेतो. इतर प्रतिस्पर्ध्यांप्रमाणेच आम्ही चेन्नईला समजतो.'' तर, हार्दिक पांड्या म्हणाला, सर्वाधिक पसंती असलेल्या दोन संघांमधील हा सामना आहे.
-
🗣️: "It's the #ElClasico of @IPL!"#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL #MIvCSK pic.twitter.com/i2TV6ump2U
— Mumbai Indians (@mipaltan) September 18, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">🗣️: "It's the #ElClasico of @IPL!"#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL #MIvCSK pic.twitter.com/i2TV6ump2U
— Mumbai Indians (@mipaltan) September 18, 2020🗣️: "It's the #ElClasico of @IPL!"#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL #MIvCSK pic.twitter.com/i2TV6ump2U
— Mumbai Indians (@mipaltan) September 18, 2020
हार्दिक म्हणाला, "या सामन्यासाठी लोक वाट पाहतात. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या अशा फ्रेंचायझी आहेत, ज्यांना चाहत्यांचे खूप प्रेम मिळते. म्हणूनच हा सामना विशेष बनला आहे."
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाची स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करण्यात येणार असून, पहिल्यांदाच या अत्यंत लोकप्रिय क्रिकेट स्पर्धेत प्रेक्षकांची उपस्थिती नसणार आहे. सलामीचा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल. हा सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमध्ये खेळला जाणार आहे.