नवी दिल्ली - तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांची भेट घेणे हा आयुष्यातील सर्वात खास क्षण असल्याचे ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने म्हटले आहे. 2010 मध्ये धर्मशाळा येथे किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान हेडनला दलाई लामा यांची भेट घेण्याची संधी मिळाली होती.
चेन्नईने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. "मला 2010 मध्ये दलाई लामा यांना भेटण्याची संधी मिळाली. माझ्या आयुष्यातील हा एक अद्भुत क्षण होता. मला खूप खास व्यक्ती भेटली. मला अजूनही आठवत आहे की त्या सामन्यात आम्हाला 190 धावा हव्या होत्या आणि आमच्यावर दबाव होता."
-
Haydos is a #superfan himself! The Dharamshala innings and the incredible low catch of his to dismiss Pollard to win 2010 @IPL are his favorites. What are yours? #WhistlePodu 🦁💛 https://t.co/6JRcXJk9le
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Haydos is a #superfan himself! The Dharamshala innings and the incredible low catch of his to dismiss Pollard to win 2010 @IPL are his favorites. What are yours? #WhistlePodu 🦁💛 https://t.co/6JRcXJk9le
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 13, 2020Haydos is a #superfan himself! The Dharamshala innings and the incredible low catch of his to dismiss Pollard to win 2010 @IPL are his favorites. What are yours? #WhistlePodu 🦁💛 https://t.co/6JRcXJk9le
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 13, 2020
तो म्हणाला, "यानंतर महेंद्रसिंह धोनी मैदानावर आला आणि त्याने केवळ 27 चेंडूत 54 धावा केल्या. सुरेश रैनानेही 46 धावांचे योगदान दिले. दोघांनीही 150 च्या सरासरीने धावा फटकावल्या आणि आम्ही अंतिम फेरी गाठली.'
2010च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सला 22 धावांनी हरवून चेन्नई सुपर किंग्जने विजेतेपद जिंकले होते. चेन्नईचे हे पहिले विजेतेपद होते.