ETV Bharat / sports

हेडनच्या 'मुंगूस बॅट'वर धोनी म्हणाला होता, की.. - dhoni's words on mongoose bat news

चेन्नई सुपर किंग्जच्या ट्विटर हँडलवर हेडनने ही प्रतिक्रिया दिली. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने हेडनला ही बॅट न वापरण्याचा सल्ला दिला होता. ''धोनी म्हणाला मी तुम्हाला आयुष्यात जे पाहिजे असेल ते सर्व देईन. फक्त या बॅटचा वापर करू नका. कृपया ही बॅट वापरू नका नाही", असे हेडनने म्हटले.

matthew hayden recalls ms dhoni's words on mongoose bat
हेडनच्या 'मुंगूस बॅट'वर धोनी म्हणाला होता, की..
author img

By

Published : May 10, 2020, 11:41 AM IST

चेन्नई - चेन्नई सुपर किंग्जचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडनच्या मुंगूस बॅटची चर्चा आजही केली जाते. आयपीएलमध्ये गोलंदाजांची धूलाई करण्यासाठी हेडनने या बॅटचा उपयोग केला होता. आज 10 वर्षानंतर हेडनने या बॅटची आठवण काढत आपली प्रतिक्रिया दिली आहे. या बॅटसंदर्भात धोनीविषयीचा एक किस्साही हेडनने चाहत्यांना सांगितला.

चेन्नई सुपर किंग्जच्या ट्विटर हँडलवर हेडनने ही प्रतिक्रिया दिली. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने हेडनला ही बॅट न वापरण्याचा सल्ला दिला होता. ''धोनी म्हणाला मी तुम्हाला आयुष्यात जे पाहिजे असेल ते सर्व देईन. फक्त या बॅटचा वापर करू नका. कृपया ही बॅट वापरू नका नाही", असे हेडनने म्हटले.

याच बॅटचा वापर करत हेडनने 2010 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध 43 चेंडूत 93 धावा चोपल्या होत्या. हेडनच्या या खेळीला सुरेश रैनाने आयपीएलमधील आपली आवडती खेळी म्हटले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.