ETV Bharat / sports

India Vs South Africa ३rd Test : अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबला, आफ्रिकेचे २ बिनीचे शिलेदार माघारी - भारत विरुध्द आफ्रिका तिसरी कसोटी

भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका संघामध्ये मालिकेतील अखेरचा तिसरा कसोटी सामना रांचीच्या मैदानावर रंगला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने  आपला पहिला डाव ९ बाद ४९७ धावांवर घोषित केला आहे.

India Vs South Africa ३rd Test : अंधुक प्रकाशामुुळे खेळ थांबला, आफ्रिकेचे २ महत्वाचे फलंदाज माघारी
author img

By

Published : Oct 20, 2019, 10:07 AM IST

Updated : Oct 20, 2019, 4:12 PM IST

रांची - भारताने आपला पहिला डाव ४९७ धावांवर घोषित केल्यानंतर, आफ्रिकेने फलंदाजीला प्रारंभ केला आहे. मात्र, आपल्या पहिल्या डावामध्ये अवघ्या ९ धावावंर २ महत्वाचे फलंदाज पाहुण्या संघाने गमावले. सलामीवीर डीन एल्गारला शमीने खातेही उघडू दिले नाही. तर, क्विंटन डी कॉकला ४ धावांवर इशांत शर्माने माघारी धाडले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला होता. आफ्रिकेकडून फाफ डू प्लेसिस १ आणि झुबायर हाम्झा शून्यावर खेळत होता.

भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका संघामध्ये मालिकेतील अखेरचा तिसरा कसोटी सामना रांचीच्या मैदानावर रंगला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने आपला पहिला डाव ९ बाद ४९७ धावांवर घोषित केला. रोहित शर्माचे (२१२) द्विशतक आणि अजिंक्य रहाणेचे (११५) शतक या जोरावर भारताने आफ्रिकेसमोर धावांचे डोंगर उभारला आहे.

हेही वाचा - केएल राहुलसोबत 'डेट' विषयावर निधी अग्रवालने सोडलं मौन; म्हणाली होय, आम्ही भेटलो...

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताची अवस्था पहिल्या दिवशी ३ बाद ३९ अशी झाली होती. भारतीय मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली स्वस्तात बाद झाले. त्यानंतर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेंनी नाबाद १८५ धावांची भागिदारी रचत भारताचा डाव सावरला. पहिल्या दिवशी भारताने रोहित शर्माच्या शतकी आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ५८ षटकांत ३ बाद २२४ धावा केल्या होत्या. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कासिगो रबाडाने २ तर एनरिच नॉर्तजे १ गडी बाद केला.

दरम्यान, अंधुक प्रकाशामुळे पहिल्या दिवशातील काही षटकांचा खेळ होऊ शकला नाही. पहिल्या दिवशी रोहित शर्मा १६४ चेंडूत ११७ धावांवर तर अजिंक्य रहाणे ८३ धावांवर नाबाद होते. आज दुसऱ्या दिवशी भारताने आपला डाव २२४ धावांवरुन पुढे खेळण्यास सुरूवात केली.

आज दुसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणे (११५) बाद झाल्यानंतर रोहित शर्माने दणकेबाज द्विशतकी खेळी केली. त्याने आपले कारकिर्दीतील पहिले द्विशतक षटकार ठोकून साजरे केले. तो व्यक्तिगत २५५ चेंडूत २१२ धावांवर बाद झाला. त्याने ही खेळी २८ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने साकारली.

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर जडेजा आणि साहाच्या जोडीने भारताला चारशेचा टप्पा पार करून दिला. संघाची धावसंख्या ४१७ असताना साहा (२४) बाद झाला. रविंद्र जडेजाने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि संघाची धावसंख्या ४५० असताना तो ही परतला. जडेजा (५१) पाठोपाठ आर अश्विनही (१४) स्वस्तात माघारी परतला. गोलंदाज उमेश यादवने आक्रमक ३१ धावा झोडपल्या. त्यानंतर मोहम्मद शमी नदीमची जोडी मैदानात असताना कर्णधार विराट कोहलीने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला.

Intro:Body:

sports marathi

Conclusion:
Last Updated : Oct 20, 2019, 4:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.