बंगळूरु - आयपीएलच्या बाराव्या मोसमातील पहिल्या ४ सामन्यात सलग पराभवास सामोरे जाणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आपल्या पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील असणार आहे. आज विराट कोहलीचा बंगळूरु संघ (शुक्रवारी) घरच्या मैदानावर कोलकाता नाइट रायडर्सशी भिडणार आहे.
हा सामना आज रात्री ८ वाजता बंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. बंगळूरुमध्ये विराट कोहली, मोईन अली, ए. बी. डिव्हिलियर्स यांसारखे दिग्गज फलंदाज असूनही संघाला आतापर्यंत झालेल्या ४ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला नाहीय. त्यामुळे कोलकाताविरुद्ध खेळण्यात येणारा हा सामना जिंकून बंगळूरु विजयाचे खाते खोलेल, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.
बंगळूरुपुढे सर्वात मोठे आव्हान असणार आहे ते, आंद्रे रसेल आणि सुनील नरेन यांचे. ही कॅरेबीयन जोडी गोलंदाजीत आणि फलंदाजीत दोन्हीकडे सरस ठरत आहे. तर रॉबिन उथप्पा, ख्रिस लीन, शुभमन गिल आणि कर्णधार दिनेश कार्तिक या फलंदाजांना लवकर बाद करण्याची किमया बंगळूरुच्या गोलंदाजांना साधावी लागणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्स - दिनेश कार्तिक (कर्णधार व यष्टीरक्षक), रॉबिन उथप्पा, ख्रिस लीन, शुभमन गिल, आंद्रे रसेल, कार्लोस ब्रेथवेट, कुलदीप यादव, निखिल नाईक, जोए डेन्ली, श्रीकांत मुंढे, नितीश राणा, संदीप वारियर, प्रसिध कृष्णा, लॉकी फग्र्युसन, हॅरी गुरने, के. सी. करिअप्पा, यारा पृथ्वीराज, सुनील नरेन, पीयूष चावला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु - विराट कोहली (कर्णधार), एबी डी’व्हिलियर्स, पार्थिव पटेल (यष्टीरक्षक) हेन्रिच क्लासिन (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, शिम्रॉन हेटमायर, शिवम दुबे, नॅथन कोएल्टर-नाइल, वॉशिंग्टन सुंदर, उमेश यादव, यजुर्वेद्र चहल, मोहम्मद सिराज,मोईन अली, कॉलिन डी ग्रॅण्डहोमी, पवन नेगी, टिम साऊदी, आकाशदीप नाथ, मिलिंद कुमार, देवदूत पडिक्कल, गुरकिराट सिंग, प्रयास राय बर्मन, कुलवंत केजरोलिया, नवदीप सैनी, हिम्मत सिंग.