ETV Bharat / sports

भारतीय क्रिकेटर मनोज तिवारीच्या बायकोने सोशल मीडियावर दिल्या शिव्या

भारतीय क्रिकेटर मनोज तिवारीच्या पत्नीने टीकाकारांना चक्क सोशल मीडियावर शिव्या घातल्याचे पाहायला मिळाले.

manoj tiwary wife sushmita roy angry after fans tag her husband as flop cricketer
भारतीय क्रिकेटर मनोज तिवारीच्या बायकोने सोशल मीडियावर दिल्या शिव्या
author img

By

Published : Jun 2, 2020, 6:49 AM IST

मुंबई - भारतीय क्रिकेटर मनोज तिवारीच्या पत्नीने टीकाकारांना चक्क सोशल मीडियावर शिव्या घातल्याचे पाहायला मिळाले. मनोजच्या पत्नीचे नाव सुश्मिता असून ती नेमकं टीकाकारांवर भडवली याचे कारण आहे तरी काय...

घडले असे की, आयपीएलच्या चाहत्यांनी आयपीएल लीगमध्ये अपयशी ठरलेल्या दहा खेळाडूंची यादी जाहीर केली होती. यामध्ये मनोज तिवारीचाही समावेश होता. ही यादी जाहीर झाल्यावर मनोजची पत्नी सुश्मिता या यादीमधून टीका करणाऱ्यांवर चांगलीच भडकली. तिने टीकांकारांना अपशब्द वापरले आहेत, त्याचबरोबर तुम्हाला ही गोष्ट करण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवालही विचारला आहे.

मनोजने १२ एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने भारतासाठी अखेरचा सामना २०१५ साली झिम्बाब्वेविरुद्ध खेळला होता. त्याचबरोबर आयपीएलमध्ये तो रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघात होता. त्यानंतर त्याला किंग्ज इलेव्हन पंजाब या संघात स्थान दिले होते. पण २०१९ सालानंतर मनोजला एकाही आयपीएलमधील संघाने संधी दिली नाही. लिलावाच्यावेळी त्याच्यावर कोणीच बोली लावली नव्हती. त्यामुळे सध्या मनोज हा भारतीय आणि आयपीएलच्या कोणत्याही संघात नाही.

हेही वाचा - युवीचे सचिनला नवे चॅलेंज...व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का!

हेही वाचा - पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज म्हणतो; मी विराटचा आदर करतो, पण..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.