ETV Bharat / sports

''मैदानावरील बुमराह हा एक वेगळाच प्राणी'' - jayawardene said beast to bumrah

जयवर्धने म्हणाला, "बुमराह शांत आहे पण जेव्हा तो मैदानावर असतो तेव्हा तो एक वेगळा प्राणी असतो. हार्दिक मैदानाबाहेर आणि मैदानाच्या आतही 'लाऊड' असतो. पण त्यात काहीतरी गडबड आहे, मला ते आवडते. ही ड्रेसिंग रूममधील छान मुले आहेत. खूप हुशार आहेत. त्यांचे व्यवस्थापन करत असल्याचा आणि फ्रेंचायझीचा भाग असल्याचा मला खूप आनंद आहे."

mahela jayawardene praises bowler jasprit bumrah for his on field performance
''मैदानावरील बुमराह हा एक वेगळाच प्राणी''
author img

By

Published : Jun 23, 2020, 3:34 PM IST

Updated : Jun 23, 2020, 4:52 PM IST

चेन्नई - आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या यशाचे रहस्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांच्यात दडलेले असल्याचे म्हटले जाते. 2013 मध्ये मुंबई इंडियन्सचा भाग झालेल्या बुमराहने आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर अनेक सामने जिंकवले. तर, आपल्या दे-दणादण फलंदाजीमुळे पांड्याने भारतीय संघात मजबूत स्थान मिळवले. मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक आणि श्रीलंकेचा दिग्गज माजी फलंदाज महेला जयवर्धनेने या दोन खेळाडूंची स्तुती केली आहे.

जयवर्धने म्हणाला, "बुमराह शांत आहे पण जेव्हा तो मैदानावर असतो तेव्हा तो एक वेगळा प्राणी असतो. हार्दिक मैदानाबाहेर आणि मैदानाच्या आतही 'लाऊड' असतो. पण त्यात काहीतरी गडबड आहे, मला ते आवडते. ही ड्रेसिंग रूममधील छान मुले आहेत. खूप हुशार आहेत. त्यांचे व्यवस्थापन करत असल्याचा आणि फ्रेंचायझीचा भाग असल्याचा मला खूप आनंद आहे."

महत्त्वाचे म्हणजे मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी सर्वाधिक चार वेळा विजेतेपद मिळवले आहे. 2019च्या हंगामाच्या अंतिम सामन्यात त्यांनी धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला होता.

Last Updated : Jun 23, 2020, 4:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.