ढाका - एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना, दुसरीकडे बांगलादेशचा क्रिकेटपटू लिटन दासच्या पत्नीसोबत एक दुर्दैवी घटना घडली आहे. लिटन दासची पत्नी देवश्री बिश्वास संचिता ही स्वयंपाकघरात चहा करत होती, त्यावेळी अचानक सिलिंडरचा स्फोट झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सिलिंडरमध्ये छिद्र असल्याने सिलिंडरचा स्फोट झाला, याची माहिती दास यांच्या घरातील मंडळींनी दिली आहे. स्फोट झाल्यानंतर देवश्रीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. देवश्रीने कसाबसा स्वत:चा चेहरा भाजण्यापासून वाचवला. या स्फोटात तिचा हात मात्र चांगलाच भाजला आहे.
देवश्रीने सांगितली आपबिती -
देवश्रीने एका संकेतस्थळाला मुलाखत दिली. यात तिने सांगिलं की, 'सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर स्वयंपाक घरातील ट्रॉलीचा एक तुकडा तुटून माझ्या अंगावर उडाला आणि मला दुखापत झाली. मी मरण अगदी जपळून पाहिले. माझ्यासाठी ही गोष्ट खूपच कठीण होती. मी जर माझा चेहरा हाताने झाकला नसता, तर पूर्ण चेहरा भाजला असता.'
या घटनेत माझे केस जळाले, त्यामुळे ते कापावे लागले. आग माझ्या चेहऱ्यापर्यंत पोहोचली असती तर मात्र खूप विचित्र घटना घडू शकली असती, असेही देवश्रीने सांगितलं.
दरम्यान, देवश्रीला उपचार करून तिला घरी पाठवण्यात आले आहे. लिटन दास आणि देवश्री यांनी मागील विश्वकरंडकाच्या आधी एप्रिलमध्ये साखरपुडा केला होता. विश्वकरंडकानंतर ते विवाहबद्ध झाले. दास याने बांगलादेशकडून आतापर्यंत २० कसोटी, ३६ एकदिवसीय आणि २९ टी-२० सामने खेळली आहेत. यात त्याने अनुक्रमे ८५९, १०७९ आणि ६३६ धावा केल्या आहेत.
हेही वाचा - Corona Virus Lockdown : क्रिकेटपटूंवर आली घरकाम करण्याची वेळ, आता बुमराहचा व्हिडिओ व्हायरल
हेही वाचा - कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी महिला क्रिकेटपटू सरसावल्या, मितालीसह यांनी दिली मदत