दुबई - डकवर्थ-लुईसचा नियम देणारे गणितज्ज्ञ टोनी लुईस यांच्या मृत्यूबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (आयसीसी) शोक व्यक्त केला आहे. लुईस यांचे नुकतेच निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यांसाठी ‘डकवर्थ-लुईस-स्टर्न’पद्धत तयार करण्यात लुईस यांचा मोलाचा वाटा होता.
आयसीसी क्रिकेटचे सरव्यवस्थापक ज्योफ अलार्डिस म्हणाले, की क्रिकेटमध्ये टोनी यांचे मोठे योगदान आहे. क्रिकेट खेळातील त्यांच्या योगदानाची नोंद येत्या काही काळातही होईल. आम्ही त्याच्या कुटुंबीयांना आणि मित्रमंडळींबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने एक निवदेनाद्वारे, लुईस यांच्या निधानावर दु: ख व्यक्त केले आहे. टोनी आणि फ्रँक यांचे योगदान कोणी विसरू शकत नाहीत. क्रिकेट विश्व त्यांचे सदैव ऋणी राहिल, असे ईसीबीने सांगितले आहे.
-
The ICC expresses its sadness at the death of mathematician Tony Lewis, who co-developed the Duckworth-Lewis-Stern system of calculating target scores in rain-affected limited-overs matches. https://t.co/hsGnO0bmfH
— ICC (@ICC) April 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The ICC expresses its sadness at the death of mathematician Tony Lewis, who co-developed the Duckworth-Lewis-Stern system of calculating target scores in rain-affected limited-overs matches. https://t.co/hsGnO0bmfH
— ICC (@ICC) April 2, 2020The ICC expresses its sadness at the death of mathematician Tony Lewis, who co-developed the Duckworth-Lewis-Stern system of calculating target scores in rain-affected limited-overs matches. https://t.co/hsGnO0bmfH
— ICC (@ICC) April 2, 2020
लुईस यांनी गणिततज्ज्ञ सहकारी फ्रँक डकवर्थ यांच्यासोबत मिळून डीएलएस नियम तयार केला. याचा पहिल्यांदा वापर १९९६-९७साली झिम्बाब्वे आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान करण्यात आला. यानंतर याची संपूर्णत: अंमलबजावणी १९९९ साली इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडकात करण्यात आली.