नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने माजी भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणचे कौतुक केले आहे. तंत्रशुद्ध फलंदाजीमुळे लक्ष्मणला बाद करणे कठीण होते, असे ली म्हणाला. क्रिकेट कनेक्ट इव्हेंटमध्ये ब्रेट लीने आपली प्रतिक्रिया दिली.
ब्रेट ली म्हणाला, “जेव्हा लक्ष्मण त्याच्या लयीत यायचा, तेव्हा त्याच्यासमोर कोणाचीही गोलंदाजी चालायची नाही.” ब्रेट लीने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत ७६ कसोटी सामन्यांमध्ये ३१० विकेट्स आणि २२० एकदिवसीय सामन्यांमध्ये ३८० विकेट्स घेतल्या आहेत.
त्याचवेळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध लक्ष्मणने शानदार कामगिरी नोंदवली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २९ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने सहा शतकांसह २४३४ धावा केल्या आहेत.