लंडन - इंग्लंडची महिला फिरकीपटू गोलंदाज लॉरा मार्शने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. २००६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या लॉराने आपल्या १३ वर्षांच्या कारकिर्दीत २१७ आंतरराष्ट्रीय बळी घेतले आहेत. तिनं इंग्लंड महिला क्रिकेट इतिहासात सर्वात यशस्वी फिरकीपटूचा मान मिळवला आहे.
इंग्लंडच्या महिला संघाचे व्यवस्थापकीय संचालक क्लॅर कोनोर यांनी लॉराच्या निवृत्तीविषयी सांगितलं की, 'लॉरानं १३ वर्ष इंग्लंड क्रिकेटसाठी अमुल्य योगदान दिले. ती इंग्लंड महिला क्रिकेट इतिहासात सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, लॉराने इंग्लंडकडून ९ कसोटी, १०३ एकदिवसीय आणि ६७ टी-२० सामने खेळले आहे. यात तिने कसोटीत २४, एकदिवसीयमध्ये १२९ आणि टी-२० त ६४ गडी बाद केले आहेत. २००९ च्या आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत लॉराने सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या.
हेही वाचा - AUS Vs NZ : स्टार्कचे ९ बळी, डे-नाईट कसोटीत ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर मोठा विजय
हेही वाचा - हेटमायरचा 'तो' षटकार पाहून विराट कोहली हतबल, पाहा व्हिडिओ
हेही वाचा - विराट आणि स्मिथसाठी लाबुशेन बनला खतरा, कसोटी क्रमवारीत ११० वरुन टॉप-५ मध्ये दाखल