नवी दिल्ली - न्यूझीलंड संघाने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेतील पहिला सामना खिशात घातला आहे. या सामन्यात लंकेचा पराजय झाला असला तरी, श्रीलंकेचे चाहते एका विक्रमामुळे आनंदित झाले आहेत.
हेही वाचा - आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाला मिळाले नवे कर्णधार
लंकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा टी-२० आंतरराष्ट्रीय किक्रेटमधील सर्वाधिक बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याच्या नावावर आता ७४ सामन्यांमध्ये ९९ विकेट्स झाले आहेत. पल्लेकेले स्टेडियममध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळताना मलिंगाने कोलिन मुनरोची विकेट काढत या विक्रमांची नोंद केली.
-
Sri Lanka skipper Lasith Malinga becomes the highest wicket-taker (99) in Twenty20 cricket. #SLvNZ pic.twitter.com/vHIinIMuqn
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Sri Lanka skipper Lasith Malinga becomes the highest wicket-taker (99) in Twenty20 cricket. #SLvNZ pic.twitter.com/vHIinIMuqn
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 1, 2019Sri Lanka skipper Lasith Malinga becomes the highest wicket-taker (99) in Twenty20 cricket. #SLvNZ pic.twitter.com/vHIinIMuqn
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 1, 2019
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मलिंगाने २३ धावांमध्ये २ गडी बाद केले. हा विक्रम करताना मलिंगाने पाकिस्तानचा गोलंदाज शाहिद आफ्रिदीला मागे टाकले आहे. बुम बुम आफ्रिदीने आपल्या टी-२० करिअरमध्ये ९९ सामन्यांमध्ये एकूण ९८ विकेट्स घेतले आहेत. या विक्रमाच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनचा समावेश आहे. त्याने ७२ सामन्यात ८८ विकेट्स घेतले आहेत.
या यादीत भारतामधून आर. अश्विन पुढे आहे. त्याने ४६ सामन्यांत ५२ बळी टिपले आहेत.