चेन्नई - आयपीएल २०२१ साठी लिलाव प्रक्रिया होत आहे. यात संघ मालकांनी परदेशी खेळाडूंवर मोठी बोली लावली. ख्रिस मॉरिस, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन आणि कायले जेमिन्सन या चौघांना आपल्या संघात घेण्यासाठी फ्रेंचायझींनी मोठी रक्कम मोजली. राजस्थान रॉयल्सने ख्रिस मॉरिसला १६.२५ कोटींच्या बोलीवर खरेदी केलं. तर ग्लेन मॅक्सवेलवर बंगळुरूने १४.२५ कोटींची बोली लावली. पंजाब किंग्जने झाय रिचर्डसनसाठी १४ कोटी मोजले. तर कायले जेमिन्सनसाठी बंगळुरूने १५ कोटी खर्च केले. दरम्यान, आयपीएल इतिहासात प्रथमच चार खेळाडूंवर १४ किंवा त्याहून अधिक कोटींची बोली लागली आहे.
आयपीएल २०२१ लिलावातील आतापर्यंतचे महागडे खेळाडू
- ख्रिस मॉरिस - १६.२५ कोटी
- कायले जेमिन्सन - १५ कोटी
- ग्लेन मॅक्सवेल - १४.२५ कोटी
- झाय रिचर्डसन- १४ कोटी
आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू
- ख्रिस मॉरिस - १६.२५ कोटी ( राजस्थान रॉयल्स २०२१)
- युवराज सिंह - १६ कोटी ( दिल्ली कॅपिटल्स २०१५)
- पॅट कमिन्स १५.५ कोटी ( कोलकाता नाइट रायडर्स, २०२०)
- कायले जेमिन्सन १५ कोटी (रॉयल चॅलेजर्स बंगळुरू २०२१ )
- बेन स्टोक्स १४.५ कोटी ( रायझिंग पुणे सुपरजायंट्स २०१७)
- ग्लेन मॅक्सवेल १४.२५ कोटी ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू २०२१)
- युवराज सिंह १४ कोटी ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू २०१४)
हेही वाचा - IPL Auction: ख्रिस मॉरिसची मूळ किंमत ७५ लाख, बोली लागली १६.२५ कोटी
हेही वाचा - IPL २०२१ Auction : प्रितीच्या पंजाब संघात शाहरुख खान