हैदराबाद - भारताचा रणमशीन विराट कोहली क्रिकेटच्या मैदानातच हिट नाही तर तो व्यवसायात सुध्दा तो सुपरहिट ठरला आहे. विराट भारताचा सर्वात मोठा सेलिब्रिटी ब्रँड असून त्याने याबाबतीत बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि किंग शाहरुख खान यांनाही मागे टाकले आहे.
अमेरिकेच्या ग्लोबल अॅडव्हाझरी फर्म डफ अॅण्ड फेल्प्सने सेलिब्रिटी ब्रँडची यादी प्रसिध्द केली आहे. या रिपोर्टनुसार विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू २३७.५ मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजे १ हजार ६९१ करोड रुपये इतकी आहे. दरम्यान, विराटच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ३९ टक्क्यांनी वाढ झालेली आहे.
क्रीडा क्षेत्रात ब्रँड व्हॅल्यूमध्ये विराटनंतर महेंद्रसिंह धोनीचा नंबर लागतो. धोनीची ब्रँड व्हॅल्यू २९३ करोडी इतकी आहे. तर सचिन तेंडुलकर या यादीत १७९ करोडसह तिसऱ्या स्थानावर आहे. रोहित शर्माने (१६४ करोड ) चौथे स्थान पटकावले आहे.
२०१९ मधील टॉप-२० ब्रँड व्हॅल्यू पर्सन ( आकडेवारी करोडमध्ये)
- विराट कोहली १६९१
- अक्षय कुमार ७४४
- दीपिका पादुकोण ६६५
- रणवीर सिंह ६६५
- शाहरुख खान ४७०
- सलमान खान ३९७
- आलिया भट्ट ३२६
- अमिताभ बच्चन ३००
- महेंद्र सिंह धोनी २९३
- आयुष्मान खुराना २८७
- ऋतिक रोशन २७७
- वरुण धवन २५१
- प्रियांका चोपडा २३०
- रनबीर कपूर १९३
- सचिन तेंदुलकर १७९
- आमिर खान १७८
- टाइगर श्राफ १७२
- अनुष्का शर्मा १७०
- करिना कपूर १६९
- रोहित शर्मा १६४
हेही वाचा - IND vs NZ : टीम इंडियाला 'ही' चूक भोवली, बुमराह, शार्दुल ठरले खलनायक
हेही वाचा - Ind vs NZ : अखेर न्यूझीलंड विजयी, ३४७ धावा करुनही भारताचा दारुण पराभव