ETV Bharat / sports

वॉशिंग्टनची 'सुंदर' कामगिरी, कर्णधार कोहलीकडून स्तुती - निर्धाव

रविवारी झालेल्या वेस्ट इंडिज विरुध्दच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात वॉशिग्टन सुंदरने तीन षटके गोलंदाजी केली. त्यामध्ये त्याने एक षटक निर्धाव टाकले तर एक गडी बाद करण्यासाठी फक्त १२ धावा खर्च केल्या. त्याच्या या कामगिरीवर कर्णधार कोहली आनंदी असून त्याने सुंदरची स्तुती केली आहे.

वॉशिंग्टनची 'सुंदर' कामगिरी, कर्णधार कोहलीची स्तुती
author img

By

Published : Aug 5, 2019, 2:02 PM IST

फ्लोरिडा - भारताने वेस्ट इंडिज विरुध्दचा दुसरा टी-२० सामना जिंकत मालिकेवर 'कब्जा' केला. या विजयानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने युवा फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरची स्तुती केली. तो म्हणाला, सुंदर भविष्यात भारतीय क्रिकेटसाठी महत्वपूर्ण योगदान देणारा खेळाडू ठरु शकतो. त्याच्यामध्ये ती क्षमता आहे.

रविवारी झालेल्या वेस्ट इंडिज विरुध्दच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात वॉशिग्टन सुंदरने तीन षटके गोलंदाजी केली. त्यामध्ये त्याने एक षटक निर्धाव टाकले तर एक गडी बाद करण्यासाठी फक्त १२ धावा खर्च केल्या. त्याच्या या कामगिरीवर कर्णधार कोहली आनंदी असून त्याने सुंदरची स्तुती केली आहे.

सुंदर विषयी बोलताना विराट म्हणाला की, वॉशिंग्टन सुंदर ज्यावेळी गोलंदाजीसाठी आला त्यावेळी फलंदाज धावसंख्या वाढवण्याच्या दृष्टीने आक्रमक शॉट्स खेळत होते. अशा परिस्थितीत सुंदरने आपली प्रतिभा दाखवत उत्कृष्ट गोलंदाजी केली. सुंदरला खूप वेळानंतर संघात खेळण्याची संधी मिळाली. यामुळे तो शांत आणि संयमी दिसत असून तो भविष्यात एक प्रतिभावान गोलंदाज होऊ शकतो. त्याची कामगिरी कौतुकास्पद आहे.

भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरुध्दच्या तीन सामन्याच्या टी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना मंगळवारी खेळवण्यात येणार आहे.

Intro:Body:

spo 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.