नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी सलामीवीर गौतम गंभीर यांनी उत्तर काश्मीरच्या हंदवाडा येथे अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या सुरक्षा दलाच्या पाच जवानांना श्रद्धांजली वाहिली आहेत. "जे लोक कोणत्याही परिस्थितीत आपली जबाबदारी पार पाडण्यास विसरत नाहीत ते खरे नायक आहेत. त्यांचा त्याग विसरता येणार नाही. हंदवाडामध्ये आपला जीव गमावलेल्या सैनिक आणि पोलिसांना मी सलाम करतो. तसेच त्यांच्या कुटुंबीयांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो'', असे कोहलीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
-
Those who don't forget their duty in any circumstances are true heroes. Their sacrifices must not be forgotten. I bow my head to the army personnel & the policemen who lost their lives at Handwara and sincerely send my condolences to their families and wish them peace🙏🏼🥺Jai Hind pic.twitter.com/HIAltyZ7QX
— Virat Kohli (@imVkohli) May 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Those who don't forget their duty in any circumstances are true heroes. Their sacrifices must not be forgotten. I bow my head to the army personnel & the policemen who lost their lives at Handwara and sincerely send my condolences to their families and wish them peace🙏🏼🥺Jai Hind pic.twitter.com/HIAltyZ7QX
— Virat Kohli (@imVkohli) May 3, 2020Those who don't forget their duty in any circumstances are true heroes. Their sacrifices must not be forgotten. I bow my head to the army personnel & the policemen who lost their lives at Handwara and sincerely send my condolences to their families and wish them peace🙏🏼🥺Jai Hind pic.twitter.com/HIAltyZ7QX
— Virat Kohli (@imVkohli) May 3, 2020
तर, गंभीरने लिहिले, "खरा नायक कोण आहे? अभिनेता? क्रीडापटू? राजकारणी? नाही. फक्त सैनिक. नेहमी. त्यांच्या आईवडिलांना सलाम. जमिनीवरील सर्वात धाडसी माणूस."
-
Who is a real hero?
— Gautam Gambhir (@GautamGambhir) May 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Actor? Sportsperson? Politician?
No, only a SOLDIER! Forever & Always!
Salute to their parents! Bravest souls walking on Earth! 🇮🇳 https://t.co/H9rmixcvB7
">Who is a real hero?
— Gautam Gambhir (@GautamGambhir) May 3, 2020
Actor? Sportsperson? Politician?
No, only a SOLDIER! Forever & Always!
Salute to their parents! Bravest souls walking on Earth! 🇮🇳 https://t.co/H9rmixcvB7Who is a real hero?
— Gautam Gambhir (@GautamGambhir) May 3, 2020
Actor? Sportsperson? Politician?
No, only a SOLDIER! Forever & Always!
Salute to their parents! Bravest souls walking on Earth! 🇮🇳 https://t.co/H9rmixcvB7
कर्नल आशुतोष शर्मा हे हंदवाडा तहसीलच्या रजवल भागात नॅशनल रायफलच्या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर होते. शिवाय मेजर अनुज सूद, लान्स नाईक दिनेश सिंह, नायक राजेश कुमार आणि सब इंस्पेक्टर काझी शकील अहमद हे सैनिक चांजीमुल्ला गावात लपलेल्या दहशतवाद्यांसह शनिवारी रात्री तब्बल 20 तास चाललेल्या चकमकीत शहीद झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहेत. "हंदवाडा येथे शहीद झालेल्या आमच्या सैनिकांना आणि सुरक्षा जवानांना श्रद्धांजली. त्यांचे बलिदानाला कधीही विसरता येणार नाही. त्यांनी संपूर्ण समर्पणाने देशाची सेवा केली आणि देशातील नागरिकांना वाचवण्यासाठी अविरत काम केले", असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.