भुवनेश्वर - चेन्नईतील पराभवानंतर विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसर्या सामन्यात भारताने विंडीजचा पराभव करून तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. या मालिकेचा अंतिम सामना येत्या रविवारी कटकमध्ये खेळला जाणार आहे. परंतु या निर्णायक सामन्यापूर्वी भारतीय संघाने ब्रेक घेतला आहे.
हेही वाचा - 'तुला माझा सामना करावाच लागेल!'..बुमराहची नवीन खेळाडूला तंबी
मालिकेत बरोबरी साधल्यानंतर, भारताने गुरूवारी ओडिशाची राजधानी गाठली. २२ तारखेला होणाऱ्या या अंतिम सामन्यापूर्वी विराट कोहली आणि संघातील इतर खेळाडूंनी मजामस्ती केली. या मजामस्तीचे फोटो कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
A day off and an afternoon with the boys is exactly what we needed 😃🤙 pic.twitter.com/6K3KLW63iJ
— Virat Kohli (@imVkohli) December 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A day off and an afternoon with the boys is exactly what we needed 😃🤙 pic.twitter.com/6K3KLW63iJ
— Virat Kohli (@imVkohli) December 20, 2019A day off and an afternoon with the boys is exactly what we needed 😃🤙 pic.twitter.com/6K3KLW63iJ
— Virat Kohli (@imVkohli) December 20, 2019
हैदराबाद येथील पहिला सामना विंडीजने ८ गडी राखून जिंकला. तर विशाखापट्टणम येथे खेळवण्यात आलेला दुसरा सामना भारतीय संघाने १०७ धावांनी जिंकत बरोबरी साधली. या सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवने कारकिर्दीतील दुसरी हॅटट्रीक नोंदवली.